ETV Bharat / state

Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांची घेतली भेट

author img

By

Published : Jan 5, 2023, 7:15 PM IST

Updated : Jan 5, 2023, 7:33 PM IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज गुरुवार (दि. ५ जानेवारी रोजी) मुंबईतील ताज हॉटेल येथे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांची भेट घेतली आहे.

Yogi Adityanath met industrialist Mukesh Ambani
योगी आदित्यनाथ यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांची घेतली भेट

मुंबई - मुंबई दौऱ्यावर असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये बराचवेळ चर्चाही झाली आहे. (Yogi Adityanath met industrialist Mukesh Ambani) दरम्यान, अंबनी यांच्या भेटीअगोदर योगी यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांचीही भेट घेतली आहे. तसेच, विविध बँकांच्या अधिकारी उद्योगपती यांचीही त्यांनी भेट घेतली आहे.

ANI TWEET
ANI TWEET

मुंबई दौऱ्या काय - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वात आधी बड्या बँकर्सच्या भेटी घेतल्या आहेत. यामध्ये त्यांनी गुंतवणुकीसाठी अर्थपुरवठा करण्याचे या सर्वांना आवाहन केले आहे. यावेळी कोटक महिंद्राचे सीईओ उदय कोटक,ए सबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा, एसआयडीबीआयचे शिवसुब्रह्मण्यम रमणसारख्या बड्या या बँकर्सचा समावेश आहे.

उद्योगपतींशी चर्चा - यामध्ये बड्या उद्योगपतींशी देखील योगींनी चर्चा झाली आहे. यामध्ये आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, हिरानंदानी समूहाचे सहसंस्थापक डॉ. निरंजन हिरानंदानी आणि जेएसडब्ल्यू समूहाचे एमडी सज्जन जिंदाल, यांच्यासह पिरामल ग्रूपचे अध्यक्ष अजय पिरामल यांच्याशी त्यांनी चर्चा केली आहे.

राज्यात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न - योगी आदित्यनाथ यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यात मोठे डेटा सेंटर उभारणीचे काम करणाऱ्या हिरानंदानींनी देखील योगींची पाठ थोपाटल्याने अधिक चर्चा होते आहे.

10 लाख कोटींचे उद्दिष्ट - उत्तर प्रदेशात होणाऱ्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटसाठी योगी आदित्यनाथ यांनी उद्योगपतींना निमंत्रण दिले आहे. ते यासाठीच मुंबई दौऱ्यावर आले होते. या समिटकरीता 17 लाख कोटींची गुंतवणूक उत्तर प्रदेशात आणण्याचा योगींचा विचार आहे. यातील 10 लाख कोटींचे उद्दिष्ट आत्ताच पूर्ण झाले आहे.

1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज गुरुवारी मुंबईत बँका आणि वित्तीय संस्थांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीदरम्यान, देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशच्या विकासात भागीदार होण्याचे आणि नवीन भारताचे 'ग्रोथ इंजिन' बनण्याच्या प्रवासात तसेच 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

हिंदुत्ववादी प्रतिमा - हिंदुत्ववादी प्रतिमा असलेल्या योगींच्या अर्थनीतीची चर्चा होत आहे. उत्तर प्रदेश बदलत असल्याचे चित्र योगी आदित्यनाथ उभे करु पाहत आहेत. तर, मुंबईतील उद्योगपतींना आपल्याकडे गुंतवणूक करण्यासाठी निमंत्रण देत आहेत. हिंदुत्ववादी आणि पारंपरिक प्रतिमा तोडत रोजगार आणि आर्थिक नीतीची जोड योगी आदित्यनाथ देऊ पाहत आहेत. त्यामुळे येत्या काळात त्यांना निवडणुकीत कसा फायदा होईल अशीही चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्र भवन - आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट झाली आहे. यामध्ये अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ यांनी या मागणीला तत्वतः मंजुरी दिल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. (Yogi Adityanath visit to Mumbai) तसेच, लवकरच प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्या दौऱ्यावर येणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी योगी आदित्यनाथ यांना सांगितले. यावर उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने लवकरच आमंत्रित केले जाईल. तुम्ही अयोध्येला आवर्जून भेट द्या, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

Last Updated : Jan 5, 2023, 7:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.