ETV Bharat / state

Vijaykumar Gavit Notice : ऐश्वर्या रायवरील विधान गावितांना भोवले; महिला आयोगाने पाठवली नोटीस

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 22, 2023, 5:48 PM IST

मंत्री विजयकुमार गावित यांनी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनबद्दल एक विधान केले होते. नियमित मासे खाल्ल्यामुळेच ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर झाले, असे विजयकुमार गावित म्हणाले होते. त्याचबरोबर याअनुषंगाने इतरही काही गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्या सौंदर्याबद्दल बोलताना मंत्री विजयकुमार गावित यांनी केलेले व्यक्तव्य त्यांना भोवले आहे. राज्य महिला आयोगाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी त्यांना नोटिस पाठवली आहे.

Vijaykumar Gavit Comment
गावित यांना महिला आयोगाची नोटीस

मुंबई : आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांनी केलेल्या ऐश्वर्यासंदर्भातील वक्तव्याने चांगलेच अडचणीत आले आहेत. विजयकुमार गावित यांनी मासे खाल्ले तर तुमचे डोळे हे अभिनेत्री ऐश्वर्या राय प्रमाणे होतील. ती मासे खाते म्हणून तिचे डोळे सुंदर आहेत असे भर कार्यक्रमात वक्तव्य केले होते. इतरही काही गोष्टी ते बोलले. राज्य महिला आयोगाकडून गावित यांच्या त्या वक्तव्याची गंभीर दखल घेण्यात आली असून, त्यांनी गावित यांना नोटीस पाठवली आहे. या नोटिसीवर तीन दिवसात खुलासा मागितला आहे.



रुपाली चाकणकर यांनी पाठवली नोटीस : आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गवितांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नोटीस बजावली आहे. लोकप्रतिनिधींच्या बेताल वक्तव्यामुळे महिलांचा अपमान होतो. तर लोकप्रतिनिधींना कुठलेही उदाहरण देण्यासाठी महिलांची गरज का भासते? असा सवाल केला आहे. तर महिलांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या लोकप्रतिनिधींवर यापुढे कडक कारवाई केली जाणार असा इशारा, चाकणकर यांनी दिला आहे. दरम्यान यासंदर्भात विजयकुमार गावित यांनी तीन दिवसात खुलासा द्यावा असेही या नोटीसमध्ये म्हटले आहे.



विधानाचा चुकीचा अर्थ : मासे खाल्ल्याने डोळे चांगले राहतात, त्वचा चांगली राहते, म्हणजेच मासे खाल्ल्याने आपले आरोग्य उत्तम राहते, असे मंत्री विजयकुमार गावित यांना सुचवायचे होते. एकंदरीत मासे खाल्ल्याने काय फायदे होतात, हे त्यांनी सांगितले. असे म्हणत भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गावितांच्या विधानाचे समर्थन केले. तर त्यांच्या विधानाआधीचा आणि नंतरचा संदर्भ न घेता काहींनी चुकीचा अर्थ काढून व्हिडिओ शेअर केला, असे स्पष्टीकरण चित्रा वाघ यांनी दिले आहे.

  • धुळे जिल्ह्यात सभेत बोलत असताना मंत्री विजय कुमार गावित यांनी महिलांचा अवमान होईल असे वक्तव्य केले. लोकप्रतिनिधींच्या वक्तव्याचा, वर्तनाचा दीर्घ परिणाम समाजमनावर होतो असतो. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी समाजात वावरताना त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे.1/2 pic.twitter.com/4sjDbTmR5u

    — Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -

  1. मी पण रोज मासे खातो, मग माझे डोळे..., नितेश राणेंचा विजयकुमार गावितांना चिमटा; तर मंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण
  2. Ashram School Principal Suspension: क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना एकाच वाहनात कोंबले; विजयकुमार गावितांनी मुख्याध्यापकाचे केले निलंबन
  3. Foods For Eyesight : या गोष्टी खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी लवकर येईल, आजपासून आहारात समाविष्ट करा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.