ETV Bharat / state

देव तारी त्याला कोण मारी! झाड पडून झालेल्या दुर्घटनेत महिला थोडक्यात बचावली; पाहा व्हिडिओ

author img

By

Published : May 18, 2021, 2:27 PM IST

Updated : May 19, 2021, 5:28 PM IST

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत कालच्या दिवसात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. जोरदार वाऱ्यांमुळे अनेक झाडे आणि झाडांच्या मोठमोठ्या फांद्या तुटून पडल्या. यामध्ये काही जणांना प्राण गमवावे लागले, तर कोणाला गंभीर दुखापत झाली आहे. विक्रोळी पार्क साईट पोलीस ठाण्यासमोर झाड कोसळले. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यामुळे एक महिला अगदी थोडक्यात वाचल्याचं समोर आलं.

tauktae cyclone update
महिला सुदैवाने थोडक्यात बचावली

मुंबई - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा फटका सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह मुंबईला देखील बसला आहे. यात अनेकांचे मोठे नुकसान झालेले आहे. झाड कोसळल्याने घरं, दुकानं, गाड्या यांचे देखील नुकसान झाले आहे. 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय आज मुंबईत आला. विक्रोळीत झाड पडून झालेल्या दुर्घटनेतून एक महिला सुदैवाने थोडक्यात बचावली आहे. हा घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहे.

महिला सुदैवाने थोडक्यात बचावली

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत कालच्या दिवसात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. जोरदार वाऱ्यांमुळे अनेक झाडे किंवा झाडांच्या मोठमोठ्या फांद्या तुटून पडल्या. यामध्ये काही जणांना प्राण गमवावे लागले, तर कोणाला गंभीर दुखापत झाली आहे. विक्रोळी पार्क साईट पोलीस ठाण्यासमोर झाड कोसळले. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यामुळे एक महिला अगदी थोडक्यात वाचल्याचे समोर आले आहे.

थरारक सीसीटीवी फुटेज समोर -

विक्रोळी पार्कसाईट या भागांमध्ये काल सूर्यनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस ठाण्याच्या बाजूचे भले मोठे झाड कोसळले होते. या घटनेचा थरारक सीसीटीवी फुटेज समोर आलेला आहे. या व्हिडिओमध्ये झाडाखालून काही पादचारी जाताना दिसत आहेत. यात एक महिला अगदी झाड कोसळत असताना त्याच्या खाली आली होती, परंतु मोठा आवाज झाल्याने ती धावत गेली आणि तिचे प्राण वाचले आहेत.

हेही वाचा - Cyclone Tauktae : सिंधुदुर्गात दोन बोटी बुडाल्या.. एका खलाशाचा मृत्यू तर तीन खलाशी बेपत्ता

Last Updated : May 19, 2021, 5:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.