ETV Bharat / state

Sushma Andhare : सुषमा अंधारेंच्या वक्तव्याविरोधात राज्यभर संताप; नाशकात वारकरी संप्रदायाचे आंदोलन, तर भाजपही आक्रमक

author img

By

Published : Dec 16, 2022, 8:40 PM IST

वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सुषमा अंधारे ( Sushma Andhare Controversial statement ) अडचणीत आल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच वारकरी संप्रदाय आक्रमक झाला (Warkari Protest in Nashik) असून, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका ( Warkari Community on Sushma Andhare ) करण्यात आली आहे. सुषमा अंधारे यांच्यावर भाजपनेसुद्धा टीका केली आहे.

Sushma Andhare Controversial Statement
सुषमा अंधारे वादग्रस्त वक्तव्य; भाजप आक्रमक, आशिष शेलारांची जाहीर टीका

वारकरी सांप्रदायाने नाशिकमध्ये काळाराम मंदिर परिसरात मोर्चा काढला

मुंबई/नाशिक : शिवसेनेच्या फायर ब्रॅंड नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare Controversial Statement ) या सध्या अडचणीत सापडल्या आहेत. आपल्या भाषणातून ( Sushma Andhare in Trouble with Controversial Statement ) संतांनी रेड्यांना शिकवले मात्र माणसांना शिकवले नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर वायरल झाला आहे. यावर राज्यभरातून टीका केली जात आहे.

वारकऱ्यांकडून नाशिकमध्ये मोर्चा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य ( Shushma Andhare Controversial Statement) केले होते. अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करून यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नाशिक जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने केली आहे. वारकरी सांप्रदायाने नाशिकमध्ये काळाराम मंदिर परिसरात मोर्चा ( Warkari Section agitation against Shushma Andhare) काढला. यावेळी वारकऱ्यांनी अंधारे यांना भगवंतांनी सद्बुद्धी द्यावी यासाठी कीर्तन करण्यात आले. यानंतर रामकुंड परिसरापर्यंत रॅली काढण्यात आली. अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा नाहीतर पुढच्या आठ दिवसात महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वारकरी संप्रदायाने दिला आहे.

अंधारेंविरोधात माफी मागो आंदोलन : भाजप नेते आशिष शेलार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे यांच्यावर टीका ( Ashish Shelar Critics Sushma Andhare ) केली आहे. ते म्हणाले की, सुषमा अंधारे यांनी केलेल्या वारकरी संप्रदायाबाबत वक्तव्यामुळे अनेकांची मन दुखावली आहेत. सातत्याने सुषमा अंधारे या हिंदू देवतांबाबत वादग्रस्त वक्तव्य करीत असतात. मात्र याबाबत उद्धव ठाकरे एक शब्दही बोलत नाहीत. उद्धव ठाकरे सुषमा अंधारेंबाबत मौन बाळगून आहेत. मात्र, सुषमा अंधारेंची हिंदू देवी-देवतांच्या बाबत केलेली ही वक्तव्य भारतीय जनता पक्ष खपवून घेणार नाही म्हणून उद्या भारतीय जनता पक्षाकडून मुंबईत "माफी मांगो आंदोलन" करण्यात येणार असल्याचे भाजप मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले आहे.

संजय राऊतांनी केले समर्थन : नाशिक, शिवसेना सातत्याने वारकरी संप्रदायासोबत राहिली आहे. आम्ही कधीही वारकरी संप्रदायाचा अवमान केला नाही व करणारही नाही. मात्र गेल्या काही वर्षापासून सातत्याने जे भाजपा सोबत नाही म्हणजे ते हिंदुत्ववादी नाहीत अशा पद्धतीने आमच्या विरोधात टार्गेट करण्याचा प्रकार सुरू आहे. याप्रकरणी वारकरी संप्रदायाच्या प्रमुख नेत्यांची आमची चर्चा सुरू आहे. स्वतः सुषमा अंधारे यांनी भूमिका मांडली असल्याचं मत शिवसेना नेते खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी मांडले. ते आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजप नेते आशिष शेलारांची सुषमा अंधारेंवर टीका

सुषमा अंधारेंचे वादग्रस्त वक्तव्य : शिवसेना ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे सध्या आपल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडल्या आहेत. "संतांनी रेड्यांना शिकवले, पण माणसांना कुठे शिकवले", असा वादग्रस्त वक्तव्य केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानंतर वारकरी संप्रदायाकडून त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला असून, सुषमा अंधारे यांनी केलेले हे वक्तव्य म्हणजे वारकरी संप्रदायाचा अपमान असल्याचे वारकरी संप्रदायाकडून म्हटले जाते.

सुषमा अंधारेंनी मागितली माफी : आपल्या विवादित वक्तव्यावर वारकरी संप्रदाय संतप्त होत असल्याचे लक्षात आल्यानंतर सुषमा अंधारे यांनी आपल्या वक्तव्यावर हात जोडून वारकरी संप्रदायाची माफी मागितली आहे. मात्र, तरीही अद्याप हा विवाद काही संपताना दिसत नाही. महानुभव पंथाकडूनदेखील सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला असून, या पंथातील साधकांनी सुषमा अंधारे ज्या पक्षात असतील त्या पक्षाला मतदान करणार नाही, अशी प्रतिज्ञा घेतली आहे. तसेच, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांना तत्काळ पक्षातून बाहेर काढावे, अशी मागणीही केली आहे.



सुषमा अंधारेंविरोधात संताप : वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या विवादित वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्यावर आता भारतीय जनता पक्षाकडूनदेखील आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच, सुषमा अंधारे यांनी केलेले हे वक्तव्य खास करून सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झालेले पाहायला मिळते. मात्र, सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाचे ट्रॉलर यांचेकडूनच आपल्यावर टीका सुरू आहे.

सुषमा अंधारेंचे समर्थन : आपल्या विरोधात इतर काहीही मुद्दे मिळत नसल्याने विरोधक जाणूनबुजून असे मुद्दे काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ठाकरे गटाच्या उपनेत्या संजना घाडी म्हणाले आहेत. सुषमा अंधारे यांचे भाषणाचे जुने व्हिडिओ काढून भारतीय जनता पक्षाचे काही ट्रॉलर्स ते व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करीत आहेत. वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओदेखील अशाच प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या ट्रॉलर्सकडून व्हायरल केला जात आहे.

ठाकरे गटाच्या संजना घाडींचा भाजपवर आरोप : सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे नेते आणि बंडखोर आमदारांची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. त्यांचा बुरखा फाडण्याचे काम सुषमा अंधारे यांनी केले असल्यामुळे जाणून-बुजून भारतीय जनता पक्षाच्या ट्रॉलर्सकडून हे काम सुरू असल्याचा आरोप संजना घाडी यांनी केला आहे. मात्र, असे असले तरी वारकरी संप्रदाय हा शिवसेनेच्या बाजूने असल्याचेही संजना घाडी यांनी सांगितले आहे.


"महाप्रबोधन यात्रे"मुळे सुषमा अंधारे प्रकाशझोतात : उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी करीत एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षासोबत आपले सरकार स्थापन केले. त्यामुळे राज्यात असलेले उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार पडले. शिवसेना अडचणीच्या काळात असताना सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात प्रवेश करीत असतानाच शिवसेनेचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली.

शिवसेनेच्या फायरब्रॅंड नेत्या म्हणून ओळख : शिवसेना अडचणीत असताना संजय राऊत हे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बंडखोर आमदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षावर तुटून पडत असत. त्यांना अटक झाल्यामुळे शिवसेनेची प्रखरपणे बाजू मांडणारा नेता शिवसेनेकडे नव्हता. अशा वेळेस सुषमा अंधारे यांनी बंडखोर आमदार आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना पत्रकार परिषदेतून हल्ला चढवला. संजय राऊत यांच्या अनुपस्थित सुषमा अंधारे या शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

अंधारे यांच्यावरोधात सत्ताधारी आक्रमक : महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून सुषमा अंधारे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली. बंडखोर नेत्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्या विरोधात वातावरण तयार करण्याचे काम सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणातून केले. यामुळेच एकनाथ शिंदे गटाचे बंडखोर आमदार असतील किंवा मग भारतीय जनता पक्ष असेल यांना पुरते हैराण करून सोडल्यामुळे सुषमा अंधारे यांच्या विरोधात सत्ताधारी पक्षांमध्ये चांगलाच संताप पसरला होता. मात्र, सुषमा अंधारे यांनी वारकरी सांप्रदाय यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या हातात आयत कोलीत मिळाले असून, सुषमा अंधारे यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे.


कोण आहेत सुषमा अंधारे : सुषमा अंधारे यांचा जन्म लातूर जिल्ह्यात मुरुड या गावी 8 नोव्हेंबर 1984 झाला आहे. मात्र, त्यांचे शालेय शिक्षण हे बीडच्या परळीमध्ये झाले. अगदी सामान्य अशा कोल्हाटी समाजातील घरामध्ये सुषमा अंधारे यांचा जन्म झाला होता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दलित भटक्या जमातींसाठी समाजसेवक म्हणून त्यांनी कार्य केले आहेत. मराठी साहित्यात हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. नेहमीच त्यांनी आपल्या भाषणातून फुले, शाहू, आंबेडकरांचे विचारांचे प्रबोधन केले आहे. ठाकरे गटात येण्याआधी सुषमा अंधारे या गणराज्य संघासाठी काम करीत होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानातून अगदी सर्वसामान्य नागरिकांना कोणते अधिकार दिले आहेत, याची जनजागृती राज्यभर फिरून सुषमा अंधारे यांनी केली आहे. उच्चशिक्षित सुषमा अंधारे यांनी अनेक ठिकाणी राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतले आहेत, तिथे त्यांनी पारितोषिक पटकावली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.