ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक LIVE : मुंबईत दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

author img

By

Published : Oct 21, 2019, 7:39 AM IST

Updated : Oct 21, 2019, 3:03 PM IST

36 मतदारसंघ असणाऱ्या मुंबईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज सकाळी मुंबईत 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली.

मुंबईत दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. तर मतदार राजाने कोणाच्या पारड्यात आपले मत टाकले, याचा निकाल 24 ऑक्टोबरला लागणार आहे. यामध्ये 36 मतदारसंघ असणाऱ्या मुंबईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज सकाळी मुंबईत 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. मुंबईत सामान्य माणूस ते राजकारणी, सेलिब्रिटी मतदान करतात. त्यामुळे मुंबई मतदारसंघात कोण-कोण मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • Live Updates -

02.51 PM : शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी मतदान केले.

02.51 PM : मुंबईच्या वांद्रे (पश्चिम) येथील मतदान केंद्रावर मतदान दीपिका पादुकोणने मतदान केले.

01.35 PM : अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांनी अंधेरी (पश्चिम) येथील मतदान केंद्रावर मतदान केले.

01.35 PM : अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी मुंबईच्या अंधेरी (पश्चिम) येथील मतदान केंद्रावर मतदान केले.

12.35 PM : सचिन तेंडुलकर, पत्नी अंजली आणि त्यांचा मुलगा अर्जुनने वांद्रे (पश्चिम) येथील मतदान केंद्रावर मतदान केले.

12.35 PM : वांद्रे (पश्चिम) येथील मतदान केंद्रावर ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा आणि दिग्दर्शक-गीतकार गुलजार यांनी मतदान केले.

12.05 PM : अभिनेत्री माधुरी दिक्षितने वांद्रे (पश्चिम) येथील मतदान केंद्रावर मतदान केले.

11.55 AM : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी वांद्रे पूर्व येथील जीवन विद्यामंदिरात बजावला मतदानाचा हक्क

11.25 AM : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बजावला मतदानाचा हक्क

10.56 AM : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

10.27 AM : अभिनेता आमीर खानने बजावला मतदानाचा हक्क

10.11 AM : माजी टेनिसपटू महेश भूपती आणि पत्नी अभिनेत्री लारा दत्ता यांनी वांद्रे (पश्चिम) येथील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क

09. 47 AM : अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी मतदान केले.

08. 45 AM : युवासेनाप्रमुख आणि वरळी मतदारसंघाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांना मतदानापूर्वी सिद्धीविनायकचे दर्शन घेतले

08. 36 AM : चेंबूर टिळक नगर येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांची गर्दी

08. 32 AM : मुंबई पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी वरळी विधानसभा मतदारसंघासाठी मतदान केले.

08. 32 AM : अभिनेत्री शुभा खोटे यांनी अंधेरी पश्चिम मतदारसंघासाठी मतदान केले.

08. 29 AM : विक्रोळी येथील माध्यमिक शाळेच्या मतदान केंद्रात मतदानासाठी नागरिकांची गर्दी

08.20 AM : लोकांना माहिममध्ये बदल हवा. तो घडवण्यासाठी लोक मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी सकाळपासून येत आहेत - मनसे उमेदवार संदीप देशपांडे

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

राज्यात 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.

या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

Intro:मुंबईत मतदानाला सुरुवात सामान्यांपासून ते राजकीय व सेलिब्रिटी मुंबईत करणार मतदान

लोकशाहीचा सण समजला जाणारा दिवस म्हणजे मतदानाचा दिवस होय आज महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे यामध्ये 36 मतदारसंघ असणाऱ्या मुंबईकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आज सकाळी मुंबईत सात वाजता मतदानाला सुरुवात झालेली आहे ती सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरू असणार आहे मुंबईत सामान्य माणसापासून ते राजकारणी व सेलिब्रिटी लोकांचे मतदान हे मुंबई मतदारसंघात येते त्यामुळे कोणकोण मतदान करत आहे व किती प्रमाणात मतदान होत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे


Body:सध्या आपण मुंबईतील माहीम मतदारसंघात आहोत या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मनसे व शिवसेना यांच्यामध्ये तुळशीचे लढाई पाहायला मिळणार आहे दादर माहीम हा मुंबईचा सेंट्रल पॉइंट समजला जातो यामध्ये राज ठाकरे व कुटुंबीय देखील मतदान करतात तसेच अनेक सेलिब्रिटी या मतदारसंघात मतदान करतात त्यामुळे सकाळी सुरुवात झालेल्या मतदानाला हळूहळू लोक येण्यास सुरुवात झालेली आहे मुंबईत जरी तुरळक पाऊस असला तरी सर्वांनी मतदान करण्याचे आव्हान लोकांना केलेले आहे त्यामुळे यावेळी मुंबईत मतदानाचा टक्का वाढेल अशा आशा केली जात आहे


Conclusion:आज मुंबईत तसेच महाराष्ट्रात मतदान असल्यामुळे मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी आस्थापना सुट्टी देण्यास सांगितले आहे त्यामुळे लोकं मोठ्या प्रमाणात बाहेर येतील व मतदान करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे
Last Updated : Oct 21, 2019, 3:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.