ETV Bharat / state

Maharashtra Politics : आमदार पुत्र मल्हार पाटील यांचा ओमराजेंना इशारा, म्हणाले, ...अन्यथा गाठ माझ्याशी आहे

author img

By

Published : Dec 4, 2022, 6:32 PM IST

Updated : Dec 5, 2022, 9:38 AM IST

Etv Bharat
Etv Bharat

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या पीकवीम्यावर बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार ओमराजे निंबाळकर व भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील ( Omraje Nimbalkar and Rana Jagjit Singh Patil Dispute ) यांच्यामध्ये वाद झाला. या वादावर राणाजगजित सिंह यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे.

उस्मानाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या पीकवीम्यावर बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर ( MP Omraje Nimbalkar ) आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील ( MLA Rana Jagjit Singh Patil ) यांच्यात शाब्दिक चकमक झाली. वादात एकमेकांनी अरेतुरेची भाषा वापरल्यामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान या वादावर राणाजगजित सिंह यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांना इशारा दिला आहे.

आमदार पुत्र विक्रम पाटील यांचा ओमराजेंना इशारा

खासदारावर आमदार पुत्राचा पलटवार : खासदार ओमराजे निंबाळकर यांचा एकेरी शब्दात उल्लेख ते करत म्हणाले की, तुझ्याकडे जे आहे ते माझ्या आजोबामुळे मिळालेले आणि राणा दादा सारख्या माणसावर तु टीका करतो, तुझे सर्व मला माहित आहे. त्यामुळे तू जास्त बोलू नको अन्यथा गाठ माझ्याशी आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.

शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार ओमराजे निंबाळकर व भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यामध्ये वाद

काय आहे प्रकरण : उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या पीकवीम्यावर बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीत विरोधी पक्षातील खासदार, आमदारांना बोलण्यात आले नव्हते. आमदार राणा जगजितसिंह पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात पीक विमा प्रश्नी बैठक घेत होते. बैठकीला का बोलवलं नाही? हा जाब विचारण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि निंबाळकर यांच्यामध्ये वाद झाला. या वादावर आता मल्हार पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

खासदार आमदारांमध्ये अरेरावी : जिल्हाधिकारी कार्यालयात काल खासदार ओमराजे निंबाळकर जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलत असताना आमदार राणाजगजितसिंह यांनी निंबाळकरांना डिवचले. ते म्हणाले की, 'बाळ आहेस तू'. यावर निंबाळकर संतापले. ‘मला बाळ म्हणू नको, तू तूझ्या औकातीत राहा, तुमचे संस्कार, तुमची औकात मला सगळं माहिती आहे. जास्त बोलू नको, तुला मी बोललेलो नाही, तुझं बोलायचं कारण नाही', अशा शब्दात त्यांनी राणा जगजितसिंह यांना सुनावले.

Last Updated :Dec 5, 2022, 9:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.