ETV Bharat / state

Nitin Gadkari : नितीन गडकरींना बाजूला करण्याचा मोदींचा प्रयत्न, दिली होती 'ही' ऑफर

author img

By

Published : Aug 18, 2023, 10:39 PM IST

Updated : Aug 18, 2023, 10:46 PM IST

Vijay Wadettiwar
विजय वडेट्टीवार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी राज्यपालपदाची ऑफर नाकारल्याचा (Nitin Gadkari rejected offer the post of Governor) दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Leader of Opposition Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बाजूला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करीत असल्याचा आरोप देखील वडेट्टीवार यांनी केला आहे.

विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांना बाजूला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक प्रयत्न करीत आहेत. मोदींनी गडकरींना राज्यपालपदाची ऑफर दिली होती, मात्र, गडकरींनी राज्यपालपदाची ऑफर (Nitin Gadkari rejected offer post of Governor) नाकारल्याचा दावा विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावरही जोरदार टीका करत भाजपाला निवडणुकीची भीती वाटत असल्याचा आरोप केला.

मोदी सरकारची नाचक्की : केंद्र सरकारच्या सात योजनांवर देखील वडेट्टीवार यांनी ताशेरे ओढले आहेत. या योजना रस्ते विकासाशी संबंधित आहेत. त्यामुळे केंद्र सरकारची नाचक्की झाली असून केंद्र सरकारने आता भ्रष्टाचाराला उत्तर दिले पाहिजे. तत्कालीन काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना त्यांनी मोठे आरोप केले, मात्र त्यात काहीच तथ्य नव्हते. आता यांना या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार. स्वतःला चौकीदार म्हणणारे कसे भ्रष्टाचारी आहे, हे देशासमोर येत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

गडकरींना राज्यपाल पदाची ऑफर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे संबंध किती सौहार्दपूर्ण आहेत, हे साऱ्या देशाला माहीत आहे, नितीन गडकरींचा काटा काढण्यासाठी त्यांच्या विभागाला अडचणीत आण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. नितीन गडकरी यांना भाजपाने राज्यपालपदाची ऑफर दिली होती. मात्र, त्यांनी ती फेटाळून लावली, असे वडेट्टीवार म्हणाले.

अजित पवारांचं अस्तित्व काय? : अजित पवार आता महाविकास आघाडीला खिचडी सरकार म्हणून बदनाम करत आहेत, मात्र, अजित पवारांचं अस्तित्व काय हे त्यांनी दाखवून द्यावे. अजित पवारांचा नेमका पक्ष कोणता? त्यांच्या पक्षात किती आमदार आहेत? हे सुद्धा अजित पवार सांगू शकत नाही. त्यामुळे त्यांनी इतरांबाबत बोलू नये, असा टोला वडेट्टीवारांनी लगावला आहे.

बेळगाबातील जनतेसोबत : बेळगावचे तीन जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्याचा प्रशासकीय प्रस्ताव असल्याचे वृत्त आहे. कोणतेही प्रशासकीय बदल विचारात घेतले जातील. पण तिथल्या मराठी माणसांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर तो खपवून घेतला जाणार नाही. मराठी भाग वेगळा होणार असेल तर त्याचे स्वागत करू, असे वडेट्टीवार म्हणाले. बेळगावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विकास कामासाठी तात्पुरता हटवला, तर त्याचा विचार केला जाईल. मात्र कोणी जाणीवपूर्वक पुतळा काढला, तर त्याविरोधात आम्ही बेळगावच्या जनतेसोबत आहोत. असे डेट्टीवार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -

  1. Rahul Gandhi : ठरलं! राहुल गांधी 'या' मतदारसंघातून लढवणार लोकसभेची निवडणूक
  2. MU Senate Election : सिनेट निवडणुकीवरून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
  3. Vijay Wadettiwar On CAG Report : नितीन गडकरींचा काटा काढण्यासाठी कॅग अहवालात ताशेरे - विजय वडेट्टीवार
Last Updated :Aug 18, 2023, 10:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.