ETV Bharat / state

MU Senate Election : सिनेट निवडणुकीवरून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

author img

By

Published : Aug 18, 2023, 7:14 PM IST

Updated : Aug 18, 2023, 7:49 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवरून (Mumbai University Senate Election) आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. विद्यापीठ निवडणुकीत बहुमत मिळणार नसल्याने शिंदे-भाजपा सरकार निवडणुकीला घाबरत असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डरपोक असल्याचा हल्लाबोल (Aaditya Thackeray Attacks Eknath Shinde ) देखील त्यांनी केला.

Aaditya Thackeray
आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद

मुंबई : विद्यापीठ सिनेट निवडणुकीसाठी (Mumbai University Senate Election) अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. या निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर होत असताना अचानक निवडणूक स्थगित (Senate Election Cancelled) करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर (Chief Minister Eknath Shinde) निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री सिनेट निवडणुकीला सामोरे जायला घाबरतात, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray Attacks Eknath Shinde ) यांनी केला. तसेच मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनीही राज्यपालांना पत्र लिहून भाजपवर टीका केली आहे.



मुख्यमंत्री डरपोक : काल रात्री अकरा वाजता सिनेट निवडणुकीचे पत्र बाहेर आले. पुढील आदेशापर्यंत निवडणूक पुढे ढकलण्यात आली. निकाल 100 टक्के आमच्या बाजूने लागला असता. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून पुढे ढकलण्यात आला आहे. राज्यात मणिपूरसारखे वातावरण नाही, भांडणं, वाद नाहीत. यासाठी दीड लाख मतदारांनी नोंदणी केली आहे. मग अचानक काय झालं? निवडणूक स्थगित का झाली? कालची बैठक कुठे झाली? असे प्रश्न आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारला विचारले आहेत. मुंबई विद्यापीठाचे अधिकारी फोन बंद करून बसले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डरपोक आहेत का? अशी टीका देखील ठाकरे यांनी सरकारवर केली आहे. लोकसभा निवडणुकाही जाहीर होऊन पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आदित्य ठाकरेंनी वर्तवली आहे. सिनेट तुमचे सरकार पाडणार नाही, आम्हीच तुमचे सरकार पाडू, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे.



विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी : काल रात्री अकराच्या सुमारास विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव, निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. सुनील भिरूड यांनी शासकीय पत्राचा संदर्भ देत निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. विद्यापीठाने जाहीर केलेली निवडणूक 10 सप्टेंबर रोजी होणार होती. या निवडणुकीसाठी विद्यार्थी संघटनांनी चांगली तयारी केली होती. मात्र रातोरात पत्रक काढून निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

हेही वाचा -

  1. Mumbai University Election : सिनेट निवडणूक स्थगित; भाजपा आणि शिंदे गटाचा रडीचा डाव, विद्यार्थी संघटनांचा आरोप
  2. Mumbai University : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक पुढे ढकलण्यामागे नक्की कोणते राजकारण? विद्यार्थी संघटना आक्रमक
Last Updated : Aug 18, 2023, 7:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.