ETV Bharat / bharat

Rahul Gandhi : ठरलं! राहुल गांधी 'या' मतदारसंघातून लढवणार लोकसभेची निवडणूक

author img

By

Published : Aug 18, 2023, 5:33 PM IST

Updated : Aug 18, 2023, 6:23 PM IST

Rahul Gandhi
राहुल गांधी

२०१९ मध्ये राहुल गांधी यांनी अमेठी आणि केरळमधील वायनाड येथून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते वायनाडमधून विजयी झाले होते, मात्र अमेठीत त्यांना मानहानीकारक पराभव पत्कारावा लागला. आता २०२४ ची निवडणूक ते कुठून लढवतील हे निश्चित झालंय.

नवी दिल्ली : पुढीलवर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आलीय. राहुल गांधी २०२४ मध्ये उत्तर प्रदेशातील अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. उत्तर प्रदेश काँग्रेसचे नवे अध्यक्ष अजय राय यांनी ही माहिती दिली.

  • #WATCH राहुल गांधी अमेठी से चुनाव लड़ेंगे। प्रियंका जी चाहें तो वाराणसी से चुनाव लड़ सकती हैं, हमारा एक एक कार्यकर्ता उनके लिए जान लगा देगा: उत्तर प्रदेश कांग्रेस अध्यक्ष अजय राय pic.twitter.com/yjHH4XrCxs

    — ANI_HindiNews (@AHindinews) August 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रियंका गांधी वाराणसीतून निवडणूक लढवू शकतात : अजय राय यांनी प्रियंका गांधी लोकसभा निवडणूक लढवतील की नाही, हे देखील सांगितले. 'प्रियंका गांधी यांना जिथून निवडणूक लढवायची असेल, तिथून त्या लढवतील. त्यांची इच्छा असेल तर त्या वाराणसीतून निवडणूक लढवू शकतात. आमचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्यासाठी प्राण देऊ शकतो', असे अजय राय म्हणाले. २०१९ मध्ये प्रियंका गांधी वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवतील अशा चर्चा होत्या. मात्र नंतर त्यांनी माघार घेतली होती. आता २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा या चर्चांना वेग आलाय.

अमेठी काँग्रेसची कौटुंबिक जागा : उत्तर प्रदेशातील अमेठी ही जागा फार पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिली आहे. मात्र २०१९ च्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी तेथे राहुल गांधी यांचा पराभव केला. अमेठी लोकसभा मतदारसंघ ही काँग्रेसची कौटुंबिक जागा आहे. या मतदारसंघातून संजय गांधी, माजी पंतप्रधान राजीव गांधी, सोनिया गांधी यांनीही लोकसभा निवडणूक जिंकली आहे. या शिवाय राहुल गांधी देखील तेथून सलग तीन वेळा खासदार राहिले आहेत.

राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून खासदार : सध्या राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातून खासदार आहेत. राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सीपीआयच्या पी पी सुनीर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. नुकतेच मोदी आडनाव प्रकरणी गेलेले राहुल गांधी यांना लोकसभेचे सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आलेय. मानहानीच्या खटल्यात त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांची खासदारकी गेली होती. विशेष म्हणजे, अजय राय यांनी पंतप्रधान मोदींच्या विरोधात दोनदा लोकसभा निवडणूक लढवली आहे. ते सलग 5 वेळा आमदारही राहिले आहेत. आता काँग्रेसने त्यांना उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष बनवून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा संदेश दिलाय.

हेही वाचा :

  1. Rahul Gandhi On Pandit Neharu : नेहरु मेमोरियल म्युझियमचे नाव बदलल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
  2. Cong AAP Meeting In Delhi : 'इंडिया'च्या मुंबईतील बैठकीपूर्वीच आज काँग्रेस-आपमध्ये बैठक; लोकसभेच्या जागा वाटपाचा होणार निर्णय?
  3. Rahul Gandhi : 'ते' या देशाचे मूळ मालक आहेत - राहुल गांधी
Last Updated :Aug 18, 2023, 6:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.