ETV Bharat / state

Fire In Girgaon : दिवाळीत आगीचे सत्र सुरूच ; गिरगावात चारचाकिंसह काही दुचाकी जळून खाक

author img

By

Published : Oct 27, 2022, 10:35 AM IST

गिरगावमधील पुंगलिया हाऊस कंपाऊंडमध्ये आग (Fire In Girgaon) लागली. या आगीत सहा चारचाकी, आठ दुचाकी वाहने जळून खाक झाली (vehicle burnt down in fire on occasion of diwali) आहेत. या आगीत कोणीही जखमी झाले नसले तरी कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Fire In Girgaon
दिवाळीत आगीचे सत्र सुरूच

मुंबई : मुंबईत दिवाळीत आगीचे सत्र सुरू होते. गेल्या चार ते पाच दिवसात आगी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. काल बुधवारी रात्री गिरगावमधील पुंगलिया हाऊस कंपाऊंडमध्ये आग (Fire In Girgaon) लागली. या आगीत सहा चारचाकी, आठ दुचाकी वाहने जळून खाक झाली (vehicle burnt down in fire on occasion of diwali) आहेत. या आगीत कोणीही जखमी झाले नसले तरी कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

मुंबईत दिवाळीत आगीचे सत्र सुरू

चार चारचाकी, आठ दुचाकी जळाल्या : गिरगाव मुगभाट उरणकर वाडीच्या नाक्यावर नवाकाळ प्रेससमोर बुधवार रात्री 11.30 च्या सुमारास आग लागली. ही आग बंद असलेल्या गोडाऊनला लागली. आग बाजूला पार्क करण्यात आलेल्या चार चारचाकी आणि आठ दुचाकी वाहनांनाही लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची पाच वाहने घटनास्थळी दाखल झाले. काही वेळात अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत गोडाऊन, चार चाकी, आठ दुचाकी वाहने जळून खाक झाली आहेत. यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागलेली वाहने ओढून बाजूला करताना एक स्थानिक नागरिक किरकोळ जखमी झाला (vehicle burnt down in fire in Girgaon) आहे.


३ दिवसात ८५ आगीच्या घटना : मुंबईत शनिवार पासून दिवाळी सण साजरा केला जात आहे. शनिवारी २२ ऑक्टोबरला १७ आगीच्या घटनांची नोंद झाली. त्यापैकी २ ठिकाणी आग लागल्याच्या घटनांची नोंद झाली. रविवारी २३ ऑक्टोबरला २७ ठिकाणी आग लागल्याच्या घटनांची नोंद झाली, त्यापैकी ७ ठिकाणी आग लागल्याच्या घटनांची नोंद झाली. सोमवारी २४ ऑक्टोबरला 34 ठिकाणी आग लागल्याच्या घटनांची नोंद झाली. त्यापैकी ठिकाणी आग लागल्याच्या घटनांची नोंद झाली. दीपावली दरम्यान दरवर्षी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सर्वाधिक आगीच्या घटनांची नोंद होते. यंदाही सोमवारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सर्वाधिक आग लागण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. गेल्या तीन दिवसात आग लागण्याच्या घटनांची नोंद झाली, असली तरी त्यात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली (fire in Girgaon Mumbai on occasion of diwali) आहे.


मागील वर्षी १५९ आगीच्या घटनांची नोंद : गतवर्षी (२०२१) दीपावली सणाच्या दरम्यान तब्बल १५९ आठिकाणी आग लागल्याच्या घटनांची नोंद झाली. त्यापैकी ४१ ठिकाणी आग लागल्याच्या घटनांची नोंद झाली. तर मागील वर्षी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ६५ ठिकाणी आग लागल्याच्या घटनांची नोंद झाली, त्यापैकी ५० टक्के म्हणजेच ३३ ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागल्याच्या घटनांची नोंद झाली. दिवाळीत लागलेल्या आगीच्या घटनांमध्ये २०१६ मध्ये लागलेली आग सर्वात मोठी होती. लोअर परळच्या कर्मशिअल कॉम्प्लेक्समध्ये फटाक्यांमुळे लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी चार मजले जळून खाक झाले होते. परंतु सर्व कार्यालयांना सुट्टी असल्याने या घटनेत कोणीही जखमी किंवा मृत्यूमुखी झालेले (fire on occasion of diwali) नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.