ETV Bharat / state

Uddhav Thackeray PC : सर्वप्रथम 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टात झाला पाहिजे - उद्धव ठाकरे

author img

By

Published : Feb 8, 2023, 2:36 PM IST

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भूमीका मांडताना 16 आमदारांची अपात्रता, शिवसेनेचे चिन्ह गोठवणे या मुद्द्यांवर भाष्य केले. शिंदे गटाने पाठीत खंजीर खुपसून गद्दारी केली अशी भानवा त्यांनी व्यक्त केली.

Uddhav Thackeray PC
उद्धव ठाकरे

मुंबई : निवडून आलेल्यांच्या आधारावरच जर निर्णय द्यायचा असेल तर ते हस्यास्पद आहे. विधान परिषद निवडणुकीत गद्दारी करुन जे बाहेर पडले त्यांनी शिवसेनेवर दावा केला, हा विकृतपणा आहे असे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. सर्वप्रथम 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टात झाला पाहिजे. जर सदस्य अपात्र होणार असतील तर त्यांचा दावा आयोगासमोर कसा असेल, त्यामुळे अपात्रतेचा निर्णय होण्याची गरज आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणले आहे.

शिवसेनेचे काय होणार : त्याशिवाय शिवसेनेचे काय होणार हा प्रश्न 6 महिने सुरू आहे. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारी केली त्यांचे काय होईल? निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दोन्ही बाजूने दावे- प्रतिदावे केले आहेत. आपण दुसरी शिवसेना मानत नाही, सेना एकच आहे. हे म्हणणे निवडणूक आयोगाकडे मांडले आणि तसे पत्र लेखी स्वरूपात दिले आहे. 1966 साली शिवसेना स्थापना झाली. लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष असेल तर. तो पक्ष वैधानिक असेल. शिवसेनेची घटना बनलेली आहे. पक्षप्रमुख निवडीची निवडणूक घेऊ द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

सदस्य नोंदणी मुळे पोटशुळ : विभाग प्रमुख हे शिवसेनेतच आहेत. निवडणूक आयोगाने दिलेली माहिती पूर्ण केली. शपथपत्र सादर केली. सदस्य संख्या देखील सांगितली. सदस्य नोंदणी बघून इतरांच्या तोंडचे पाणी पळाले असेल. पक्षांतर्गत निवडणूक होते. क्रमवारी पाहिली तर कोंबडी आधी की अंड अशी अवस्था आहे. गद्दारांनी शिवसेनेवर दावा करावा, म्हणजे निंदनीय आहे. घटना तज्ज्ञांशी बोललो, त्यांनी देखील ते अपात्र होतील, असे मत मांडले आहे. देशातील वातावरण बघता लोकशाही धोक्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल लवकर लावावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. निर्णय कोणताही लागो, पण अपात्रतेनंतर काय होईल? आपत्रतेचा निकाल पहिला लागावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

कारण नसताना संभ्रम : जनतेच्या मनात कारण नसताना शिवसेनेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्ही स्पष्टीकरण दिले. सदस्य संख्या सहित जेवढी माहिती मागितली, ती दिली आहे. एजन्सी लावून शपथपत्र तयार केली होती. कारण त्यांना भीती आहे. शिवसेनेची बाजू भक्कम आहे. शिवसेनेला कोणताही धोका नाही. विधानसभा आणि परिषदचे सदस्य गृहीत धरले जातात. त्यामुळे शिंदे गटाने केलेला दावा अयोगाने फेटाळून लावला.

हेही वाचा :Attack on Aaditya Thackeray: डीजेच्या वादातून आदित्य ठाकरेंवर हल्ला, आमदार बोरणारे असं करणार नाहीत- संजय राठोड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.