ETV Bharat / state

Uddhav Thackeray on CM : शपथ घेण्यापेक्षा मराठा आरक्षणप्रश्नी मार्ग काढा, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 4:57 PM IST

Uddhav Thackeray On CM : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मागील वेळी उपोषण केलं तेव्हा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उपोषणस्थळी भेट देत, ४० दिवसांच्या आत मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्न मार्गी लावू, असं आश्वासन दिलं होतं. मात्र ४० दिवस उलटून मराठा आरक्षणावर सरकारने कोणताच तोडगा काढला नाही. यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे.

Uddhav Thackeray on CM Shinde
ठाकरेंच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला

प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे

मुंबई Uddhav Thackeray On CM : सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) वातावरण चांगलच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला ४० दिवसांचा अल्टीमेटम दिल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसलं आहे. तर दुसरीकडे मुंबईत वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या गाडीची काही मराठा तरुणांनी तोडफोड केली. मनोज जरांगे पाटलांना अटकेची मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. तर मराठा आरक्षणावरुन विविध प्रतिक्रिया येत असताना, आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरुन राज्य व केंद्र सरकावर टीका केली आहे.



फक्त शपथ घेऊन उपयोग काय : आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री बंगल्यावर इतर पक्षातील काही पदाधिकार व कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर टिकास्त्र डागलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मागील वेळी उपोषण केलं तेव्हा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट देत, ४० दिवसांच्या आत मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावू, असं आश्वासन दिलं होतं. मात्र ४० दिवस उलटूनही मराठा आरक्षणावर सरकारने कोणताच तोडगा काढला नाही. यावर उद्धव ठाकरेंनी टिका केली. तुम्ही जरुर शपथ घ्या, पण शपथ घेतल्यानंतर तसे वागा, किंवा त्यावर तसा मार्ग तरी काढा, फक्त शपथ घेऊन उपयोग काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.



पंतप्रधानांनी मनोज जरांगे-पाटीलांची भेट घ्यावी : पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज सत्तेतील काही लोक आमच्याकडे येत आहेत. इनकमिंग आऊटगोईंग सुरु आहे. सध्या राज्यात घाणेरडं राजकारण सुरू आहे, ते आम्हाला गाडायचं आहे. यासाठी हे लोक माझ्यासोबत आले आहेत. मराठा आरक्षण कायद्याच्या चौकटीत राहून, सर्व बाबी तपासून दिल्या पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली त्याचं काय झालं. पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेऊन, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, असंही ठाकरे म्हणाले.

हेही वाचा -

  1. Uddhav Thackeray On BJP : भाजपाला मोठा धक्का, 'या' मोठ्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश
  2. Uddhav Thackeray Dasara Melava : 'निर्लज्ज सदासुखी' असा खेळ सुरू; आमदार अपात्र मुद्द्यावरुन ठाकरेंचा नार्वेकरांवर निशाणा
  3. Shiv sena Melava on Dasara 2023: शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून शक्तिप्रदर्शन, दोन्ही बाजूनं सोडले जाणार एकमेकांवर टीकेचे बाण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.