ETV Bharat / state

Uday Samant : उदय सामंत उद्योगाबाबतची श्वेतपत्रिका करणार जाहीर

author img

By

Published : Nov 3, 2022, 12:23 PM IST

राज्यातून बाहेर चाललेल्या उद्योगांवर (Business) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या खडा जंगी पाहायला मिळत आहे. मात्र या उद्योगांबाबत नेमकी सत्य स्थिती काय? यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत श्वेतपत्रिका (White Paper) जाहीर करणार आहेत. या श्वेतपत्रिकरून सत्य परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Uday Samant
उदय सामंत

मुंबई: राज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर केवळ तीन महिन्यात पाच मोठे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले आहेत. राज्यात होणारे प्रकल्प गुजरात मध्ये नेमके जातात कसे असा सवाल विरोधकांनी उठवत राज्य सरकारला सवाल केला आहे. राज्य सरकारच्या गलथान कारभारामुळेच हे प्रकल्प राज्याच्या बाहेर चालले आहेत. राज्यामध्ये गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण नाही, अशीही टीका विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षाकडे केली जात आहे.

मात्र, आता या सर्व प्रकरणात आणि राज्याच्या बाहेर गेलेल्या प्रकल्पांबाबत उद्योग मंत्री उदय सामंत हे श्वेतपत्रिका काढणार आहेत. वेदांता समूहाचा फॉक्सकॉर्न प्रकल्प (Vedanta Group's Foxcorn project) आणि टाटा एअरबसचा प्रकल्प (Tata Airbus project) बाबत श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून तात्कालीन महाविकास आघाडी सरकारने प्रकल्प राज्यात रहावे यासाठी कोणते प्रयत्न केले होते याबाबत माहिती समोर येणार आहे.

श्वेतपत्रिका म्हणजे काय?: (White Paper) एखाद्या प्रकल्पाबाबत किंवा योजनेबाबत राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने नेमके कोणती पावले उचलली. या प्रकल्पासाठी तात्कालीन सरकारने कोणत्या बैठका घेतल्या? कोणाशी चर्चा - बैठका केल्या? यासोबतच केंद्र सरकारसोबत याबाबत काही पत्रव्यवहार केला आहे का? किंवा केंद्र सरकार सरकारसोबत याबाबतच्या काही बैठका चर्चा केल्या आहेत का? याबाबतची अधिकृत इतंभुत माहिती म्हणजे श्वेतपत्रिका असते. एखाद्या प्रकल्पावर किंवा योजनेवर राजकीय वाद प्रतिवाद होत असतील तर त्या प्रकल्पासाठी किंवा योजनेसाठी सरकार कडून श्वेतपत्रिका जाहीर केली जाते.

श्वेतपत्रिका जाहीर केली होती: श्वेतपत्रिका जाहीर झाल्याने संबंधित योजना किंवा प्रकल्पाबाबत त्या नागरिकांना किंवा नेते मंडळींना ती माहिती उपलब्ध होत असते. श्वेतपत्रिकेमुळे ज्या प्रकल्पामुळे किंवा योजनेमुळे संभ्रम निर्माण झाला आहे, तो दूर होण्यास मदत होते. 2012 साली तात्काली आघाडी सरकारवर कधीच सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला होता. या आरोपानंतर आघाडी सरकारने या प्रकरणावर श्वेतपत्रिका जाहीर केली होती. तर तेथेच राज्यामध्ये 2014 साली सत्तांतर झाल्यानंतर 2015 साली अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वित्त विभागाची श्वेतपत्रिका जाहीर केली होती. त्यानंतर आता विद्यमान सरकार कडून उद्योग मंत्री उदयसामध्ये राज्यातील उद्योगांबाबतची श्वेतपत्रिका जाहीर करणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.