ETV Bharat / state

Bhoomi Poojan of Trishul War Museum: लेहमध्ये 'त्रिशुळ युद्ध संग्रहालय होणार सुरू, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपुजन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 8:55 PM IST

Bhoomi Poojan of Trishul War Museum
त्रिशुळ युद्ध संग्रहालयाचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लेहमध्ये त्रिशुळ युद्ध संग्रहालयाच्या कामाचं भूमिपूजन आज पार पडलंय. या संग्रहालयामुळे सीमावर्ती भागात पर्यटनाला मोठी चालना मिळेल. महाराष्ट्रातील पर्यटक येतील, तेव्हा त्यांना अभिमान वाटेल असं मनोगत त्यांनी व्यक्त केलंय. (Bhoomi Poojan of Trishul War Museum)त्रिशुळ युद्ध संग्रहालय

मुंबई Bhoomi Poojan of Trishul War Museum : लेहमधील कारु येथे त्रिशुळ युद्ध संग्रहालयाच्या कामाचं भूमिपूजन आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते झालंय. सुमारे 3 कोटी रुपये खर्च करुन हे संग्रहालय उभारण्यात येतंय. हा निधी महाराष्ट्र सरकारने दिलाय. या संग्रहालयासाठी आणखी निधी लागला, तर तो दिला जाईल. या उपक्रमाशी महाराष्ट्र जोडला गेलाय, हे आमचं भाग्य आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलंय.

Bhoomi Poojan of Trishul War Museum
त्रिशुळ युद्ध संग्रहालयाचे भूमिपूजन


त्रिशूळ हे उत्पत्ती, स्थिती आणि लयाचं प्रतीक : 14 कोअर कमांडर लेफ्टनंट जनरल रशीम बाली, मेजर जनरल पी. के. मिश्रा आणि श्रीकांत भारतीय यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्रिशूळ हे उत्पत्ती, स्थिती आणि लयाचे प्रतीक आहे. त्रिशूळ हे शौर्याचं प्रतिक आहे. त्रिशूळ डिविजननं सुद्धा असंच शौर्य कायम दाखविले आहे. जेथे श्वास घेणे कठीण आहे, अशा ठिकाणी तुम्ही पराक्रम गाजवताय. आम्ही तुमच्या शौर्याला सलाम करतो. देशाचा सन्मान वाढविण्यात लष्कराची भूमिका अतिशय महत्वाची आहे. त्यात त्रिशूळ डिविजनचं योगदान महत्वपूर्ण आहे. आज भारत सर्व क्षेत्रात प्रगती करतो आहे. चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यावर आता भारतानं सूर्याची मोहीम हाती घेतलीय, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलय.(Trishul War Museum in Leh)

भारत आज जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलीय. लष्करासाठी दुर्गम भागात रस्ते, पुल अशा सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण केले जात आहे. या संग्रहालयामुळे सीमावर्ती भागात पर्यटनाला सुद्धा मोठी चालना मिळेल. महाराष्ट्रातील पर्यटक येतील, तेव्हा त्यांना अभिमान वाटेल- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राकडून आर्थिक सहाय्य : सुमारे वर्षभरापूर्वी त्रिशुळ युद्ध संग्रहालयाची संकल्पना उदयास आली होती. महाराष्ट्रातील अ‍ॅड. मीनल भोसले आणि सारिका मल्होत्रा या दोन महिलांनी या भागात भेट दिली. तेव्हा या संकल्पनेचा उदय झाला. त्यांनी श्रीकांत भारतीय यांच्या कानावर हा विषय टाकला. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर यासाठीचे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकारने घेतला. राज्य सरकारने हा निधी दिल्याबद्दल लेफ्टनंट जनरल रशीम बाली, मेजर जनरल पी. के. मिश्रा यांनी यावेळी बोलताना महाराष्ट्र सरकारचे आभार मानले. लष्करी शाळेच्या विद्यार्थ्यांनी तसेच स्थानिक नागरिकांचा समावेश असलेला एक सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा यावेळी आयोजित करण्यात आला होता. (Trishul War Museum)

त्रिशुळाप्रमाणे आकार : त्रिशूळ युद्ध स्मारकानजीक हे संग्रहालय उभारण्यात येतंय. याचा आकार त्रिशुळाप्रमाणे असणार आहे. यात तीन प्रदर्शन कक्ष असणार आहेत. त्यात 1962, 1965, 1971, 1991 आणि अगदी अलिकडच्या काळात झालेल्या कारवायांमधील शहीदांच्या स्मृती असणार आहेत. हे त्रिशुळ डिविजन साहसी जवानांचे आहे. एकिकडे पाकिस्तान तर दुसरीकडे चीन अशा दुहेरी क्षेत्रात भारताच्या अखंडतेसाठी ते कार्यरत असतात. या संग्रहालयात पाषणशिल्प, या त्रिशुळ डिविजनच्या स्थापनेचा इतिहास, विविध अभियानांमध्ये मिळालेले यश, युद्धात वापरलेले शस्त्र, दारुगोळा, वाहने, संपर्क व्यवस्था, जवानांनी कुटुंबीयांशी केलेला पत्रव्यवहार या बाबी असणार आहेत. 1962 च्या युद्ध काळात या डिविजनची स्थापना करण्यात आली होती. आतापर्यंत 150 वीरता पुरस्कार या डिविजनला मिळालेले आहेत.

हेही वाचा :

  1. Devendra Fadnavis Reaction : जपानी म्हणतात चीनपेक्षा भारतातील गुंतवणूक सुरक्षित - देवेंद्र फडणवीस
  2. Nehru Memorial Renamed : मोदी सरकारने दिल्लीतील नेहरू वस्तुसंग्रहालयाचे बदलले नाव, 'ही' असणार नवी ओळख
  3. Khalanga War Memorial: 'खलंगा युद्ध स्मारक' हे गोरखा योद्ध्यांच्या शौर्याचे प्रतीक, वाचा सविस्तर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.