ETV Bharat / state

Mumbai Railway Project: रेल्वे प्रकल्प रद्द केल्याने लाखो प्रवाशांना त्याचा फटका बसेल; प्रकल्प रद्द करू नयेत- प्रवासी संघटनेची मागणी

author img

By

Published : Apr 20, 2023, 1:23 PM IST

राज्य सरकारने मुंबई तसेच एमएमआर रिजनमध्ये मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एमयूटीपी प्रकल्पांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून पनवेल एलिव्हेटेड आणि विरार वसई पनवेल हे दोन्ही मार्ग केंद्र सरकारने रद्द केले आहेत. हे प्रकल्प रद्द केल्याने लाखो प्रवाशांना त्याचा फटका बसणार असल्याने हे प्रकल्प रद्द करू नयेत, अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे.

Railway Project
रेल्वे प्रकल्प
रेल्वे मंत्रालयाने लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी प्रकल्प रद्द करू नये- रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता

मुंबई : मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये 75 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. मध्य हार्बर आणि पश्चिम मार्गावर रेल्वे सेवा उपलब्ध आहे. रेल्वे प्रवाशांना चांगली सेवा देता यावी, यासाठी एमयूटीपी 3 ए हा प्रकल्प जाहीर करण्यात आला होता. या प्रकल्पाअंतर्गत मुंबईहून पनवेल येथे जाण्यासाठी जलद उन्नत मार्ग बनवण्यात येणार होता. तसेच पश्चिम उपनगरातील विरार वसई येथून पनवेल येथे जाण्यासाठी मार्ग उभारला जाणार होता. यासाठी 21 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार होते. हा प्रकल्प रद्द केल्याने एमयुटीपी 3 ए ची सुरुवातीचा खर्च 54 हजार 777 कोटी रुपये होता, तो कमी करून 33 हजार 690 कोटी इतका करण्यात आला आहे.

प्रवाशांची होणार गैरसोय : सीएमएसटी पनवेल फास्ट कॉरिडॉर हा वातानुकूलित इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट्ससाठी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर लाईनवर एक उन्नत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर म्हणून प्रस्तावित होता. एलिव्हेटेड फास्ट कॉरिडॉरमध्ये 11 स्थानके होती. ती प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडली जाणार होती. 2031 पर्यंत 10 लाखांहून अधिक प्रवाशांना आणि 2041 पर्यंत 13 लाख प्रवाशांना सेवा देणे अपेक्षित होते. 12,331 कोटींचा कॉरिडॉर मध्य रेल्वेच्या 10 लाखांहून अधिक दैनंदिन प्रवाशांना दिलासा देण्यासाठी तयार करण्यात आला होता.

एसी गाड्याही केल्या कमी : 60 किलोमीटरपेक्षा धीम्या गतीने चालणाऱ्या हार्बर लाईनवरील अवलंबून असलेल्या प्रवाशांना याचा फायदा होणार होता. रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. या गर्दीमुळे प्रवाशांचा ट्रेन मधूनपडून मृत्यु होतो. यावर उपाय म्हणून एसी लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एसी लोकलचे दरवाजे बंद असल्याने ट्रेन मधून पडून मृत्यु कमी होतील अशी संकल्पना होती. रेल्वे प्रशासन 210 एसी लोकल विकत घेणार होते. मात्र आता केवळ 191 एसी लोकल विकत घेणार आहे.

प्रकल्प रद्द करू नये : मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमधून 80 लाख प्रवासी प्रवास करतात. त्यांना चांगली सुविधा देता यावी त्यांना सुखद जलद प्रवास देता यावा म्हणून एमयूटीपी प्रकल्प जाहीर करण्यात आले. याचा फायदा लाखो प्रवाशांना होणार होता. मात्र हे प्रकल्प रद्द केल्याने लाखो प्रवाशांना त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी हे प्रकल्प रद्द करू नये, अशी मागणी रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी केली आहे.

हेही वाचा : Mumbai Local Train: विजेची तार तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; लोक ट्रॅकवरून निघाले चालत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.