ETV Bharat / state

MNS Gudi Padwa Melava: शिवाजी पार्कवर आज मनसेचा पाडवा मेळावा; 'असे' आहे वाहतुकीचे नियोजन

author img

By

Published : Mar 22, 2023, 7:19 AM IST

राज्यभरात मराठी नववर्षाचा जल्लोष साजरा केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातर्फे आज दादर येथील शिवाजी पार्क येथे पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर नागरिक हे मोठ्या संख्येने कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी हजर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर तसेच कार्यक्रमस्थळी जाण्याच्या मार्गावर मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे.

MNS Gudi Padwa Melava
मनसेचा गुढीपाडवा मेळावा

मुंबई : गुढी पाडवा हा हिंदू नववर्षाचा सण म्हणून साजरा करण्यात येतो. दादर येथील शिवाजी पार्कवर मनसेच्या पाडवा मेळाव्यानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनसे सैनिक एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शिवाजी पार्क येथे गर्दी उसळण्याची शक्यता आहे. या गर्दीमुळे होणारी वाहतुकीची कोंडी आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे. वाहतूक सुरळीत राखण्याकरीता वाहतूक पोलीसांकडून वाहनांच्या पार्किंगवर निर्बंध घालण्यात येणार आहेत. सदर वाहतुकीचे निर्बंध 22 मार्चच्या दुपारी दोन वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत अंमलात राहणार आहेत.


वाहने उभी करण्यास प्रतिबंध असलेले रस्ते : शिवाजी पार्कवर गुढी पाडवा मेळाव्यानिमित्त राज ठाकरे यांची आज संध्याकाळी ६ वाजता जाहीर सभा होणार आहे. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, पर्याची मार्ग सिध्दिविनायक मंदिर जंक्शन उजवे वळण एस. के. बोले रोडवर वाहने उभी करण्यास प्रतिबंध आहे. पर्यायी आगार बाझार, पोतुर्गीज चर्च, डावे वळण गोखले रोड या रस्त्याचा वापर करावा. राजाबढे चौक जंक्शन ते केळुस्कर मार्ग उत्तर जंक्शनपर्यंत वाहने उभी करण्यास प्रतिबंध आहे. पर्याची एल. जे. रोड, गोखले रोड, स्टिलमैन जंक्शन उजवे वळण घेवून स्वातंत्रवीर सावरकर मार्गाचा वापर करावा. दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथून दक्षिण वाहीनी या मार्गावर वाहने उभी करण्यास प्रतिबंध आहे. पर्यायी मार्ग राजा बढे जंक्शन येथून एल. जे. रोडचा वापर करावा. गडकरी चौक येथून केळुस्कर रोड दक्षिण व उत्तर या मार्गावर वाहने उभी करण्यास प्रतिबंध आहे. पर्यायीएम. बी. राऊत मार्गाचा वापर करावा.




पश्चिम आणि उत्तर उपनगरे : पश्चिम आणि उत्तर उपनगरे येथून पश्चिम द्रुतगती मार्गाने येणारी वाहने सेनापती बापट मार्गाने माटुंगा रेल्वे स्थानक येथे आल्यानंंतर माटुंगा रेल्वे स्थानक ते रुपारेल कॉलेज, या दरम्यान मेळाव्यास येणारे नागरिकांना उतरुन वाहने रेती बंदर, माहिम, इंडिया बुल्स फायनान्स सेंटर पीपीएल पार्किंग, कामगार मैदान, सेनापती बापट मार्गावर तसेच हलकी वाहने कोहिनुर पीपीएल पार्किंगमध्ये पार्क करु शकतात. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून मोठे फेरबदल पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या पाडवा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष आहे.



शहरे व दक्षिण मुंबई : वीर सावरकर रोड मार्गे दक्षिण मुंबई कडून येणाऱ्या वाहनांना रविंद्रनाथ नाट्यमंदिर येथे उतरून वाहने इंडिया बुल्स फायनान्स पीपीएल पार्किंग, आप्पासाहेब मराठे मार्ग. तसेच बी. ए. रोड मार्गे येणाऱ्या वाहनांनी दादर टी. टी सर्कल येथे नागरिकांना सोडल्यावर पाच गार्डन माटुंगा किंवा आर. ए. के. चार रस्ता या निर्देशित ठिकाणी पार्किंग करतील. पाडवा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी वाहन चालकांनी त्यांची वाहने निर्देशित केलेल्या ठिकाणापासून निश्चित केलेल्या वाहनतळ ठिकाणी पार्क करावीत, अशी सुचना देण्यात आली आहे.


मेळाव्याकरीता येणाऱ्या वाहनांकरीता पार्किंग : १) संपुर्ण सेनापती बापट मार्ग, माहिम आणि दादर, २) कामगार मैदान, सेनापती बापट मार्ग ३) इंडिया बुल फायनान्स सेंटर पीपीएल पार्किंग एलफिन्स्टन ४) कोहिनूर पीपीएल पार्किंग शिवाजी पार्क, ५) आप्पासाहेब मराठे मार्ग, ६) पाच गार्डन, माटुंगा, ७) रेती बंदर, माहिम , ८) आर ए के ४ रोड. पूर्व उपनगरे ठाणे, नवी मुंबई येथून पुर्व द्रुतगती मार्गाने येणारी वाहने दादर टी. टी. सर्कल येथे उतरून वाहने पाच गार्डन-माटुंगा आणि आरएके ४ रस्ता येथे पार्क करावी. आज पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

हेही वाचा : Gudipadwa 2023 : मराठी नववर्षाची होते गुढीपाडव्याला सुरुवात, जाणून घ्या काय आहे महत्व

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.