ETV Bharat / state

Traffic Changes In Road : अंगारकी संकष्टी ; सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीत बदल

author img

By

Published : Jan 7, 2023, 9:16 AM IST

Updated : Jan 10, 2023, 6:35 AM IST

१० जानेवारीला अंगारकी संकष्टी चतुर्थी (traffic Changesc on 10 January) आहे. त्यामुळे दादर वाहतूक विभागातील खालील रस्त्यावर वाहतूकीचा ताण जास्त वाढण्याची शक्यता आहे. सिध्दीविनायक मंदीर व आसपासच्या परिसरात वाहतुकीची कोंडी (Shree siddhivinayak temple Mumbai) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले (traffic Changes on angarki sankshathi Chaturthi) आहे.

Angaraki Sankashti Chaturthi
अंगारकी संकष्टी

मुंबई : नवीन वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यातच अंगारकी संकष्टी १० जानेवारीला असल्याने श्री. सिध्दीविनायक मंदीर व आसपासच्या परिसरात भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी होण्याची (traffic Changesc on 10 January) आहे. गर्दीमुळे वाहतुकीवर परिणाम होऊन या परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील मार्गावरील वाहतूकीचे नियमन करण्यात आले (traffic Changes on angarki sankshathi Chaturthi) आहे.

अधिकाराचा वापर : होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीचे नियमन करण्यासाठी योग्य ते आदेश पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी पारित केले आहे. जनतेस पोहचणारा धोका, अडथळा व गैरसोय टाळण्यासाठी राज तिलक रौशन, भारतीय प्रशासकीय सेवा पोलीस उपआयुक्त (मुख्यालय व मध्य विभाग), वाहतूक यांना मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ११५ (१९८८ चा नियम ५९) नुसार मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून याद्वारे खालीलप्रमाणे आदेश देत (Shree siddhivinayak temple Mumbai) आहे.



वाहतूकीचा ताण : दिनांक १० जानेवारीला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दादर वाहतूक विभागातील खालील रस्त्यावर वाहतूकीचा ताण जास्त वाढण्याची शक्यता (Angaraki Sankashti Chaturthi) आहे. त्यामुळे स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, एम. के. बोले रोड, गोखले रोड दक्षिण व उत्तर, सयानी रोड, अप्पासाहेब मराठे मार्ग या मार्गांवरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी १० जानेवारीला सकाळी ०६.०० वाजल्यापासून ते रात्री 12 वाजताच्या यादरम्यान नमूद मार्गावरील वाहतूक नियमनाबाबत खालीलप्रमाणे निर्बंध लादण्यात येत आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गरज भासल्यास निर्बंधांमध्ये वाढ करण्यात येणार (Traffic Changes In Road) आहे.

दिशा मार्ग सुरु : गोखले रोड दक्षिणवरुन पोर्तुगीज चर्च जंक्शन येथून एस. के. बोले मार्गावर उजवे वळण बंद करण्यात येईल. गोखले रोड उत्तर वरुन जाखादेवी जंक्शन येथून दत्ता राऊळ आणि एन. एम. काळे मार्गावर डावे वळण बंद करण्यात येईल. एस. के. बोले मार्गावर आगार बाजार येथून दक्षिणेकडे सिध्दीविनायक मंदीराकडे जाण्यास प्रवेश बंद असणार आहे. तसेच एस. व्ही. एस रोडवरून सिध्दीविनायक मंदीर जंक्शन येथून एस. के. बोले मार्ग, आगार बाजार, पोर्तुगीज चर्च येथे जाण्याकरिता एक दिशा मार्ग सुरु (Traffic Changes) राहील.


परवानगी : सवानी रोडवरील लेनिन ग्राड चौक येथून शंकर घाणेकर मार्गावर जाण्यासाठी उजवे व डावे वळण बंद असेल तर सिध्दीविनायक मंदीर व आसपासच्या परिसरात राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना आवश्यकतेनुसार इच्छितस्थळी जाणेकरीता परवानगी देण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त राज तिलक रौशन यांनी दिले (Angaraki Sankashti Chaturthi) आहे.

Last Updated : Jan 10, 2023, 6:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.