ETV Bharat / state

Religious Places :  लग्न ठरलेय.. या प्रमुख धार्मिकस्थळी नववधूला घेऊन जाण्याची तयारी करा

author img

By

Published : Oct 28, 2022, 11:08 AM IST

Updated : Oct 29, 2022, 2:23 PM IST

Maharashtra religious places
Maharashtra religious places

लग्नानंतर दुसऱ्या दिवसापासून देवदर्शनाला सुरूवात ( Maharashtra religious places ) होते. यात वरवधू महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरात जोडीने दर्शनाला जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच मंदिरांबाबत माहिती देणार आहोत.

मुंबई : तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची श्री महालक्ष्मी, ज्योतिबा शिर्डीते साईबाबा, जेजूरीचा खंडोबा या धार्मिक स्थळांना भाविक हमखास भेट (Maharashtra religious places ) देतात. वर्षभर भाविकांचा ओघ तिथे पाहायला मिळतो. आज आम्ही तुम्हाला अशाच मंदिरांबाबत माहिती देणार आहोत. जाणून घेऊयात.

तुळजाभवानी : तुळजापूर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातले शहर ( Tuljapur Tuljabhawani ) आहे. येथे तुळजाभवानीचे प्रसिद्ध मंदिर असून ते महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असल्याची हिंदू भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव व भक्तांची गर्दी असते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानीला अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे छत्रत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याची ही कुलदेवता आहे. या देवीच्या आशीर्वादाने शिवरायांना राज्यस्थापनेची प्रेरणा मिळाली, अशी समजूत भाविकांमध्ये प्रचलित आहे.आख्यायिकेनुसार देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्याची प्रचिती दिली होती.

कोल्हापूर श्री महालक्ष्मी : कोल्हापूरात वसलेली श्री महालक्ष्मी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध ( Kolhapur Shri Mahalakshmi ) आहे. प्राचीन करवीर नगरीतील या अंबाबाईचा उल्लेख पुराणातही सापडतो. येथील मंदिर बरेच प्राचीन असल्याचे बोलले जाते. कोकणातून राजा कर्णदेव कोल्हापुरात आला त्यावेळी मूर्ती एका लहान मंदिरात होती. कर्णदेवाने भोवतालचे जंगल मोकळे केले. सतराव्या शतकांनतर महालक्ष्मी महाराष्ट्राचे दैवत म्हणून नावारूपास आले. मंदिराच्या परिसरात जवळपास 35 लहान-मोठी मंदिरे व 20 दुकाने आहेत. वास्तुशास्त्रीय बांधणीनुसार चालुक्य राजवटीत मंदिराचे बांधकाम झाले असावे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आले असून मंदिरावर पाच कळस आहेत. मुख्य मंदिरास लागूनच गरूड मंडप आहे.

कोल्हापूर ज्योतिबा : ज्योतिबा किंवा केदार या देवाचा उल्लेख यादवपूर्व काळातही ( Kolhapur Jyotiba ) आढळतो. महानुभावाच्या पोथ्यांमध्ये पैठण व जळगाव येथील केदारेश्वर मंदिरांचा उल्लेख आहे. खोलेश्वराच्या शिलालेखातही केदारेश्वराचा उल्लेख आहे. अग्नी, तेज व ज्ञानाचे प्रतीक असलेला ज्योतिबा भक्तांना आपलासा वाटतो. ग्रामीण लोकगीतांतून व ओव्यांतून ज्योतिबाला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. भक्तिरसाने न्हाऊन निघालेल्या या ओव्या व लोकगीते ज्योतिबाच्या प्रती बहुजनांची उमटलेली स्पंदने आहेत. चैत्री पौर्णिमेच्या सोहळ्यांत भक्तांच्या ओठांतून शब्द फुटतात. ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत. ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत.

शिर्डी साईबाबा : शिर्डी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातले एक शहर ( shirdi saibaba )आहे. हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ८३ कि.मी. अंतरावर वसले आहे. इ.स.च्या १९च्या शतकाच्या उत्तरार्धात साईबाबांच्या वास्तव्यामुळे शिर्डी नावारूपास येऊ लागले. साईबाबांच्या पश्चात तेथे भक्तांनी उभारलेल्या साईबाबा मंदिरामुळे धार्मिक क्षेत्र म्हणून हे प्रसिद्धी पावले आहे. साईबाबांच्या समाधीनंतर त्यांच्या भक्तांनी शिर्डीस मंदिर उभारले. या मंदिरामुळे शिर्डीस धार्मिक क्षेत्राचे महत्त्व आले असून दररोज सुमारे ८,००० ते १२,००० भाविक साईबाबा मंदिरास भेट देण्यासाठी शिर्डीस येतात.

सिद्धिविनायक गणपती : अहमदनगर जिल्ह्यात सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर ( siddhivinayak ganpati ) आहे. सिद्धिविनायक हे अष्टविनायकांपैकी एक आहे. कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे. अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती. पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. मधु व कैटभ या असुरांशी भगवान विश्णू अनेक वर्षे लढत होते. मात्र, त्यात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूने असुरांचा वध केला.

Last Updated :Oct 29, 2022, 2:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.