ETV Bharat / state

Mumbai Corona Update : मुंबईत रुग्णसंख्येत पुन्हा घट, आज ५९५६ नव्या रुग्णांची नोंद; तर १२ रुग्णांचा मृत्यू

author img

By

Published : Jan 17, 2022, 7:56 PM IST

Updated : Jan 17, 2022, 8:11 PM IST

आज मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट ( Today Mumbai Corona Patient ) होऊन ५ हजार ९५६ रुग्णांची नोंद झाली आहे. आज १२ रुग्णांचा मृत्यू ( Today Corona Patient Death In Mumbai ) झाला आहे. रुग्णसंख्या घटत असल्याने सध्या ५० हजार ७५७ सक्रिय रुग्ण आहेत.

Mumbai Corona Patient Number
Mumbai Corona Patient Number

मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी ( Corona Thired Wave ) लाट आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारांच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. गुरुवारी १३ हजार ७०२, शुक्रवारी ११ हजार ३१७, शनिवारी १० हजार ६६१, रविवारी ७ हजार ८९५ रुग्णांची नोंद झाली आहे. आज सोमवारी त्यात आणखी घट ( Today Mumbai Corona Patient ) होऊन ५ हजार ९५६ रुग्णांची नोंद झाली आहे. आज १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या घटत असल्याने सध्या ५० हजार ७५७ सक्रिय रुग्ण आहेत.

५९५६ नव्या रुग्णांची नोंद -

मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारांच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज (१७ जानेवारीला) ५९५६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १२ मृत्यूची नोंद झाली आहे. आज १५,५५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५ हजार ८१८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ९ लाख ३५ हजार ९३४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ४६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ५० हजार ७५७ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५५ दिवस इतका आहे. मुंबईमधील ४७ इमारती सील आहेत. १० जानेवारी ते १६ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर १.२२ टक्के इतका आहे.

८५.३ टक्के बेड रिक्त -

मुंबईत आज आढळून आलेल्या ५९५६ रुग्णांपैकी ४९४४ म्हणजेच ८३ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज ४७९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ४५ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३८,१४० बेडस असून त्यापैकी ५६२८ बेडवर म्हणजेच १४.७ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ८५.३ टक्के बेड रिक्त आहेत.

रुग्णसंख्या अशी घटते आहे रुग्णसंख्या -

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यात वाढ हाऊ लागली. ६ जानेवारीला २०,१८१, ७ जानेवारीला २०,९७१, ८ जानेवारीला २०,३१८, त्यानंतर रुग्णसंख्या घटली असून ९ जानेवारीला १९४७४, १० जानेवारीला १३६४८, ११ जानेवारीला ११६४७, १२ जानेवारीला १६४२०, १३ जानेवारीला १३७०२, १४ जानेवारीला ११३१७, १५ जानेवारीला १०६६१, १६ जानेवारीला ७८९५, १७ जानेवारीला ५९५६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद -

मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

धारावीत २६ रुग्ण -

मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान हॉटस्पॉट ठरली होती. पहिल्या लाटे दरम्यान सर्वाधिक ९४, तर दुसऱ्या लाटेदरम्यान ९९ रुग्ण आढळून आले होते. धारावीत गेले काही महिने कोरोनाचे १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. मात्र, मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्यावर धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली. ७ जानेवारीला १५० तर ८ जानेवारीला १४७ सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत गेली. आज १७ जानेवारीला २६ रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत एकूण ८४४२ रुग्ण असून ७७२६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. धारावीत सध्या २९९ सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचा - N.D.Patil Passed Away : कष्टकऱ्यांचा आधार हरपला! शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी.पाटील यांचे निधन

Last Updated : Jan 17, 2022, 8:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.