ETV Bharat / state

Contractor Extortion Case: कॉन्ट्रक्टरने मानवतेपायी केली आर्थिक मदत; तिघांनी पैसेही वखरले अन् केले ब्लॅकमेलिंग

author img

By

Published : May 12, 2023, 9:17 PM IST

मुंबईच्या कांदिवलीतील एका मेट्रो कॉन्ट्रक्टर व्यावसायिकाला ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध चारकोप पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. प्रमोद सिंग, दीपक बाबर आणि सुनिल सोराडकर अशी या तिघांची नावे आहेत. तिन्ही आरोपींनी एका खासगी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी असल्याची बतावणी करून फिर्यादीकडून २८ लाख रुपये वसुलले. याप्रकरणी चारकोप पोलीस अधिक तपास करत आहेत.

Contractor Extortion Case
ब्लॅकमेलिंग

मुंबई: खंडणीसाठी सोशल मीडियावर अपप्रचार करुन बदनामीसह धमकी दिल्याचा या तिघांवर आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले. वंशबहादूर मुन्नी जैस्वाल हे मेट्रो कॉन्ट्रक्टर असून ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत कांदिवली परिसरात राहतात. त्यांचा दीपक हा मित्र असून ते त्याला गेल्या काही वर्षांपासून ओळखतात. तो स्वत:ला मानव अधिकार आयोगाशी संबंधित असल्याचे सांगत होता. बारा वर्षांपूर्वी त्याने त्याची ओळख प्रमोदशी करून दिली होती. प्रमोद हा मानवाधिकार इमर्जन्सी सोशल हेल्पलाईन नावाच्या संस्थेचा महाराष्ट्र अध्यक्ष असून याच संस्थेत त्याचा मित्र सुनिल हादेखील काम करतो. सुनिलने तो पत्रकार असून त्याचे डिजिटल मिडीया नावाचे लोकल चॅनेल असल्याचे सांगितले होते.

कर भला तो हो बुरा: फिर्यादी वंशबहादूर यांनी कोरोना काळात सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी तिन्ही आरोपींना काही आर्थिक मदत घेतली होती. जून २०२२ रोजी प्रमोदने त्यांच्याकडे संस्थेसाठी तीन लाखांची मागणी केली होती; मात्र आर्थिक अडचणीमुळे त्यांनी ती मदत देण्यास नकार दिला होता. त्याचा या तिघांना राग होता. या तिघांनी त्यांना किमान ५० लाख रुपये मिळावे यासाठी फिर्यादी वंशबहादूर यांना ब्लॅकमेल करून धमकी दिली होती. यावेळी वंशबहादूर यांनी 9 लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र त्यांनी ५० लाखांची मागणी करुन त्यांची सोशल मीडियावर बदनामी करण्यास सुरुवात केली. त्यांच्या चॅनेलवर खोट्या बातम्या देऊन त्यांची बदनामी केली. ते व्हिडीओ अनेकांना व्हायरल केले.


अखेर गुन्हा दाखल: आरोपींनी वंशबहादूर यांच्याविरुद्ध शासकीय कार्यालयात खोट्या तक्रारी केल्या. त्यामुळे ते त्यांच्या संस्थेतून बाहेर पडले होते. तिन्ही आरोपींनी संस्थेच्या नावाने त्यांच्याकडून आतापर्यंत २८ लाख २३ हजार रुपये उकाळले होते. तसेच संस्थेतून त्यांची हकालपट्टी केल्याचा प्रचार केला होता. सतत पैशांसाठी धमकी आणि ब्लॅकमेलला कंटाळून अखेर फिर्यादीने या तिघांविरुद्ध चारकोप पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी प्रमोद सिंग, दीपक बाबर आणि सुनिल सोराडकर या तिघांविरुद्ध कट रचून तोतयागिरी करून खंडणीची मागणी करणे, पैशांचा अपहार करून फसवणूक करणे, धमकी देणे तसेच आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा:

  1. Thane Crime : पतीचे उतारवयात दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबध, सिव्हिल इंजिनिअर पत्नीची आत्महत्या
  2. CBI Raid On Sameer Wankhede House : समीर वानखेडे यांच्या घरावर 'सीबीआय'ची छापेमारी, भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल
  3. Devendra Fadnavis On Param Bir Singh : परमबीर सिंह यांचे निलंबन कॅगने रद्द केले; देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.