ETV Bharat / state

उद्यापासून विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेस सुरूवात

author img

By

Published : May 5, 2021, 7:22 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या 2020-21 या शैक्षणिक वर्षाच्या कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या सत्र 6 च्या परीक्षा उद्यापासून (दि. 6 मे) ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 21 मेपर्यंत चालणार आहे. या परीक्षा 450 पेक्षा जास्त महाविद्यालयात घेण्यात येणार आहे.

मुंबई विद्यापीठ
मुंबई विद्यापीठ

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या 2020-21 या शैक्षणिक वर्षाच्या कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या सत्र 6 च्या परीक्षा उद्यापासून (दि. 6 मे) ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 21 मेपर्यंत चालणार आहे. या परीक्षा 450 पेक्षा जास्त महाविद्यालयात घेण्यात येणार आहे. पदवीच्या अंतिम वर्षाचे दीड लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी सर्व महाविद्यालये सज्ज झाली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्य शासनांकडून राज्यात कडक निर्बध लावण्यात आले आहे. त्यामुळे इतर व्यवहारांप्रमाणेच परीक्षांचे नियोजन देखील विस्कळीत होण्याची शक्यता होती. त्यामुळे राज्यातील विद्यापीठाचा परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठाने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर 2020-21 या शैक्षणिक वर्षातील परीक्षेचे नियोजन व्यवस्थित केल्यामुळे हिवाळी सत्राच्या अंतिम वर्ष सत्र 5 च्या परीक्षा डिसेंबर-जानेवारी दरम्यान घेण्यात आल्या. या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान जाहीर झाला. यामुळे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या सत्र 6 च्या परीक्षा मे 2021 मध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार या परीक्षा होत आहेत. या परीक्षा महाविद्यालये स्वतंत्रपणे त्यांच्या वेळापत्रकानुसार 6 ते 21 मे 2021 दरम्यान घेणार आहेत.

अंतिम वर्षाच्या 45 परीक्षा

पदवीच्या अंतिम वर्षाच्या सत्र 6 च्या बीए, बीकॉम, बीएस्सी, बीएमएस, बीएमएम, बीकॉम अकाउंट अँड फायनान्स, बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स, बीकॉम फिनान्शियल मार्केट, बीएस्सी बायोटेक्नॉलॉजी, बीएस्सी काम्प्यूटर सायन्स, बीएस्सी आयटी, बीएस्सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज यासह मानव्य, वाणिज्य, विज्ञान व आंतरशाखीय विद्याशाखेच्या एकूण 45 परीक्षा आजपासून (दि. 5 मे) सुरू होत आहेत.

1 लाख 55 विद्यार्थी परीक्षा देणार

बीकॉम सत्र 6 या परीक्षेत सर्वाधिक म्हणजे 68 हजार 101, बीएमएसमध्ये 16 हजार 501, बीएमध्ये 14 हजार 592, बीएस्सी 10 हजार 770, बीकॉम अकाउंट अँड फायनान्समध्ये 10 हजार 251, बीएस्सी आयटीमध्ये 9 हजार 720 यासह बीएमएम, बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स, बीकॉम फिनान्शियल मार्केट, बीएस्सी बायोटेक्नॉलॉजी, बीएस्सी काम्प्यूटर सायन्स, बीएस्सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज व इतर विविध विद्याशाखेच्या अंतिम वर्षाच्या 45 परीक्षेमध्ये 1 लाख 55 हजार 155 विद्यार्थी परीक्षेसाठी बसत आहेत.

94 समूह व 450 महाविद्यालये

परीक्षेच्या आयोजनासाठी विद्यापीठाने सर्व विद्याशाखांच्या महाविद्यालयाचे समूह तयार केलेले आहेत. प्रत्येक क्लस्टरमधील एका महाविद्यालयास लीड महाविद्यालय म्हणून ही जबाबदारी दिलेली आहे. अशा 94 लीड महाविद्यालयावर ही जबाबदारी सोपवली आहे. पदवीच्या अंतिम वर्षाच्या या परीक्षा मुंबई विद्यापीठातील 94 समूह महाविद्यालयाद्वारे 450 पेक्षा जास्त महाविद्यालयात ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. 15 एप्रिल ते 5 मे 2021 दरम्यान प्रथम व द्वितीय वर्षाच्या सत्र 2 ते 4 या नियमित व सत्र 1 व 3 च्या पुनर्परीक्षार्थीच्या परीक्षा यशस्वीरीत्या महाविद्यालयात ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाल्या. या उन्हाळी सत्रामध्ये विद्यापीठ चार विद्याशाखेमधून 500 पेक्षा जास्त परीक्षा घेत असून, त्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयामार्फत ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जात आहेत. या उन्हाळी सत्राच्या परीक्षेसाठी विद्यापीठाचा परीक्षा विभाग सज्ज झाला आहे. असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - अशोक चव्हाणांनी मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा; मराठा आंदोलकांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.