ETV Bharat / state

Shivsena Banner : महाराष्ट्रातून गुजरातला किती प्रकल्प गेले? ठाकरे गटाकडून यादी टाकत बॅनरबाजी

author img

By

Published : Oct 30, 2022, 9:27 AM IST

टाटा एअरबस प्रकल्प ( Tata Airbus Project ) गुजरातला गेल्यामुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रातील सहा प्रकल्प गुजरात मध्ये कुठे स्थलांतरित झाले त्याची यादी प्रकाशित करण्यात आली आहे.

Shivsena Banner
Shivsena Banner

मुंबई : टाटा एअरबस प्रकल्प ( Tata Airbus Project ) गुजरातला गेल्यामुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant ) जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करत आहेत. त्यांची राजीनाम्याची मागणी सुद्धा शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Shiv Sena leader Aditya Thackeray ) यांनी केली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत राज्यातले, मुंबईतील कुठले प्रकल्प राज्याच्या बाहेर गुजरात मध्ये कुठे गेले याची यादी त्यांनी आता बॅनर द्वारे मुंबईत प्रकाशित केली आहे. यावरून पुन्हा एकदा प्रकल्पावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे.


यासाठीच हवा आहे का बदल ? मुंबई महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात मध्ये जात असल्याने एकीकडे सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये जुंपली असताना, आता या मुद्द्यावर बॅनरबाजी सुरू झाली आहे. मुंबईतील लालबाग भागामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मुंबई, महाराष्ट्रातील कुठले प्रकल्प गुजरात मध्ये कुठल्या ठिकाणी स्थलांतरित झाले त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. हे बॅनर सध्या लोकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहेत.या बॅनर मध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील तरुणाई विचारतेय, यासाठीच हवा आहे का बदल? या मथल्याखाली गुजरात व महाराष्ट्र राज्याचां नकाशा दाखवण्यात आला असून मुंबई, महाराष्ट्रातील सहा प्रकल्प गुजरात मध्ये कुठे स्थलांतरित झाले त्याची यादी या ठिकाणी प्रकाशित करण्यात आली आहे.

ठाकरे गटाकडून यादी टाकत बॅनरबाजी

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये : महाराष्ट्रातील कुठले प्रकल्प गुजरात मधील कुठल्या भागात गेले यामध्ये - इंटरनॅशनल फायनान्शिअल सेंटर, मुंबई हा प्रकल्प गुजरातमध्ये अहमदाबाद येथे स्थलांतरित करण्यात आला. डायमंड बोर्स, मुंबई हा प्रकल्प गुजरात मधील सुरत येथे स्थलांतरित करण्यात आला आहे. मरीन अकॅडमी हा प्रकल्प पालघर मध्ये अपेक्षित असताना तो गुजरात येथील द्वारका येथे स्थलांतरित करण्यात आला आहे. वेदांत- फॉक्सकॉन पुण्यामध्ये होणारा हा प्रकल्प गुजरात येथील धोलेरा येथे स्थलांतरित करण्यात आला. वलक ड्रग पार्क, रायगड येथे होणारा हा प्रकल्प गुजरात येथील भरूच येथे स्थलांतरित करण्यात आला असून सध्या गाजत असलेला टाटा-एअरबस हा नागपूर मध्ये होणारा प्रकल्प गुजरात मधील वडोदरा येथे स्थलांतरित करण्यात आला आहे. एकंदरीत या सर्व प्रकल्पांची यादी या बॅनरवर छापण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.