ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : गणेशोत्सवात मिठाई व्यावसायिकांचे मोठे नुकसान

author img

By

Published : Aug 28, 2020, 1:33 PM IST

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिठाईकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे लोक मिठाई विकत घेण्यास घाबरत आहेत. यामुळे, मिठाई व्यवसायिकांचे मोठे नुकसान होत असून खरेदी ही दहा टक्क्यांवर सुरू आहे.

गणेशोत्सवात मिठाई व्यावसायिकांचे मोठे नुकसान
गणेशोत्सवात मिठाई व्यावसायिकांचे मोठे नुकसान

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात मिठाई, पेढे दिसेनासे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मिठाई खरेदीवर मोठा परिणाम दिसून आला आहे. यामुळे दरवर्षी होणारी मिठाई खरेदी यावर्षी कमी झाली आहे. या सर्व बाबींमुळे मिठाई व्यावसायिक यांचे मोठे नुकसान होत असून खरेदी ही दहा टक्क्यांवर सुरू आहे. गेली अठरा वर्ष मी होलसेल दराने मिठाई तयार करून दुकानांना द्यायचं काम करतो. परंतु, एवढे मोठे नुकसान कधीही झाले नव्हते, असे मिठाई व्यावसायिक दिलीप इनकर यांनी यावेळी सांगितले.

गणेशोत्सवात मिठाई व्यावसायिकांचे नुकसान

दरवर्षी गणेशोत्सवात मिठाईची विक्री तेजीत असते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मिठाई व्यावसायिकांना मोठ्या नुकसानीला झाले सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सवात घराघरात नातेवाईकांची रेलचेल असते. नातेवाईकांचा पाहुणचार आणि बाप्पाला नैवेद्य म्हणून मिठाईचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. यंदा मात्र मिठाईकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे लोक मिठाई विकत घेण्यास घाबरत आहेत. यावेळी साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जात असल्यामुळे यंदा घरातच गोड पदार्थ तयार केले जात आहेत.

गेल्या अठरा वर्षांपासून वर्षांपासून मी या व्यवसायात आहे. आमचे मुख्य सण असलेले रक्षाबंधन, गणेशोत्सव इत्यादी सण कोरोनामुळे वाया गेले आहेत. सध्या 10 टक्के मिठाई आम्ही तयार करत आहोत आहोत. ही 10 टक्के मिठाई दुकानदारांना पोचवण्याचे काम आम्ही करतो. कच्च्या मालाचे भावदेखील वाढले आहेत. तसेच कामगार आपल्या गावी परतले आहेत. यामुळे दुसऱ्या कामगारांच्या उपस्थित मिठाईचे काम सुरू आहे. कोरोनामुळे आणि माध्यमात दाखवण्यात येणाऱ्या मिठाई भेसळीच्या बातम्यांमुळे ग्राहकांनी यंदा मिठाईकडे पाठ फिरवली आहे, असे मिठाई विक्रेते दिलीप इनकर यांनी सांगितले.

हेही वाचा - ईटीव्ही विशेष : कोरोना काळात हवाई वाहतूक क्षेत्र अडचणीत.. 'या' कंपन्यांना बसला फटका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.