मुंबई - बहीण आणि भावातील अतूट नात्याचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले बंधू व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी बांधून हा सण साजरा केला. सुप्रिया सुळे यांनी मोठे बंधू जयंत पवार आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे औंक्षण करून राखी बांधली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.
अजित पवार यांना औंक्षण करून बांधलेल्या राखीसंदर्भात सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात, "बहीण-भावातील नात्याचे बंध आणखी घट्ट करणारा सण, राखी पौर्णिमा. यानिमित्ताने माझे भाऊ अजितदादा यांचे औंक्षण करून त्यांना राखी बांधली. तुम्हा सर्वांना या सणाच्या हार्दिक शुभेच्छा.