ETV Bharat / state

water supply cut off  : ७ तसेच ८ जून रोजी मुंबईतील 'या' विभागांचा पाणी पुरवठा बंद!

author img

By

Published : Jun 4, 2022, 5:59 PM IST

water supply cut in mumbai
मुंबईत पाणीपुरवठा बंद

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे (Greater Mumbai Municipal Corporation) मुंबईतील काही भागांचा पाणी पुरवठा बंद ( water supply cut off ) राहणार आहे. महापालिका जलवाहिनी दुरुस्तीचे काम करणार असल्याने, काही रुग्णायांचा पुरवठाही बंद असणार आहे.

मुंबई - मुंबई महानगरपालिकेकडून (Greater Mumbai Municipal Corporation) शिवडी बस डेपो समोर जलवाहिनीचे काम केले जाणार आहे. ( water supply cut off ) यासाठी ७ व ८ जून रोजी शिवडी, परळ, नायगांव, भायखळा माझगाव, फोर्ट, कुलाबा, सँडहर्स्ट रोड आदी विभागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यावेळी मुंबईमधील मोठ्या रुग्णालयांचा पाणी पुरवठाही बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे. तसेच पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद - बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे एफ/दक्षिण विभागातील पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्याकरिता शिवडी बस डेपोसमोर ७५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर जोड देण्याचे काम ७ जून रोजी सकाळी १० वाजेपासून ८ जून पर्यंत एकूण २४ तासांसाठी हाती घेण्यात येणार आहे. या कारणाने, सदर कालावधीत महानगरपालिकेच्या एफ/दक्षिण विभागातील रुग्णालय प्रभाग, शिवडी (पूर्व व पश्चिम), परळ गांव, काळेवाडी, नायगांव, शिवडी, वडाळा, अभ्युदय नगर, तसेच ए विभागातील फोर्ट कुलाबा, बी विभागातील सँडहर्स्ट रोड,(Sandhurst Road) ई विभागातील भायखळा, माझगांव परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद (Water supply in Mazgaon area) राहणार आहे.

काही भागात कमी दाबाने: शहरातील उत्तर-दक्षिण विभागातील काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नमूद कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका (Greater Mumbai Municipal Corporation) प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

रुग्णालयांचा पाणी पुरवठा बंद - जल वाहिन्यांच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद केला जाणार असल्याने के. ई. एम. रुग्णालय,(K. E. M. Hospital) टाटा रुग्णालय, बाई जेरबाई वाडिया रुग्णालय, एम. जी. एम. रुग्णालय, या रुग्णालयांनाही २४ तास पाणीपुरवठा होणार नाही. तर भायखळा येथील जे. जे रुग्णालयांला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

हेही वाचा - Sanjay Raut On BJP : 'लक्षात ठेवा आमच्याकडे देखील सत्ता आहे'; संजय राऊत यांचा भाजपला इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.