ETV Bharat / state

विवेक ओबेरॉयचे 'ते' ट्विट नेटकऱ्यांकडून धारेवर, राज्य महिला आयोगानेही बजावली नोटीस

author img

By

Published : May 20, 2019, 7:07 PM IST

अभिनेता विवेक ऑबेरॉय याने अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिच्या संदर्भात वापरलेले छायाचित्र आणि त्यावरील कमेंटमुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. याची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे.

विवेक ओबेरॉयचे 'ते' ट्विट नेटकऱ्यांकडून धारेवर, राज्य महिला आयोगही पाठवणार नोटीस

मुंबई - अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या एक्झिट पोलच्या संदर्भात केलेल्या ट्विटचा सध्या चांगलाच वनवा पेटला आहे. या ट्विटमध्ये अभिनेता विवेक ऑबेरॉय याने अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिच्या संदर्भात वापरलेले छायाचित्र आणि त्यावरील कमेंटमुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. याची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. यासंदर्भात त्याला नोटीस बजावली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

काय म्हणाल्या विजया रहाटकर-
विवेकने शेअर केलेले ट्विट हे क्रियेटिव्हीटी नसून एका महिलेचा अनादर करणारे आहे. तो एक जबाबदार अभिनेता आहे. त्याच्याकडून अशा वर्तणुकीची अपेक्षा नव्हती. यासंदर्भात त्याला नोटीस पाठवण्यात येणार आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर

काय होते विवेकचे ट्विट -
विवेक ओबेरॉयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये ऐश्वर्या सलमान खान, विवेक आणि अभिषेकसोबत दिसत आहे. ऐश्वर्याच्या वैयक्तिक आयुष्यावर हा मीम आहे. यामध्ये ऐश्वर्या-सलमानला ओपिनियन पोल, ऐश्वर्या-विवेकला ऐक्झिट पोल आणि ऐश्वर्या-अभिषेक यांच्या जोडीला रिझल्ट दाखवण्यात आला आहे. हा फोटो शेअर करून विवेकने यावर कॅप्शनही दिले आहे. 'क्रिएटिव्ह, इथे कोणतेच राजकारण नाही, हेच आयुष्य आहे', असे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. त्याच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याला धारेवर धरले आहे.

Intro:हिंदी चित्रपट अभिनेता विवेक ओबेरॉय याच्या एक्जिट पोल च्या संदर्भात केलेल्या ट्विट चा वाडा चांगलाच पेटला असून या ट्विटमध्ये अभिनेता विवेक ऑबेरॉय याने अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिच्या संदर्भात वापरलेले छायाचित्र आणि त्यावरील कमेंट याची गंभीर दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. विवेक ऑबेरॉय यमाई केलेलं ट्विट ही क्रिएटिव्ह नसून महिलांच्या बाबतीत अनादर करणारे असल्यामुळे राज्य महिला आयोगाकडून विवेक ओबेरॉय यास नोटीस बजावली जाईल अस राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्पष्ट केले आहे. Body:( विजया रहाटकर यांचे मराठी हिंदी बाईट जोडले आहेत. )
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.