ETV Bharat / state

एसटी आक्रोश आंदोलन LIVE : दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्याचा पगार मिळणार- अनिल परब

author img

By

Published : Nov 9, 2020, 9:57 AM IST

Updated : Nov 9, 2020, 3:39 PM IST

ST workers' agitation for overdue wages
एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतनासाठी आंदोलन

15:33 November 09

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार बोनस

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच बोनस देणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे

15:31 November 09

एका महिन्याचे वेतन काही तासात मिळणार- परिवहनमंत्री अनिल परब

एका महिन्याचे वेतन काही तासांत मिळणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. 

15:25 November 09

दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना दोन महिन्याचा पगार मिळणार

दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना दोन महिन्याचा पगार मिळणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. 

15:10 November 09

सरकारने निर्णय न घेतल्यास टोकाची भूमिका घेऊ - प्रवीण दरेकर

एसटी कर्मचाऱ्यांबाबत सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी लागेल, अशा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. 

15:08 November 09

पगार न झाल्यास तीव्र आंदोलन करणार; इंटक संघटनेचा इशारा

नाशिक-  येत्या दोन दिवसांत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा इंटक संघटनेने दिला आहे. 

14:58 November 09

कोल्हापुरात आक्रोश आंदोलनाला सुरुवात

मोलमजुरी करणाऱ्यांच्या घरात दिवाळी साजरी होऊ लागली आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी काळी होत आहे. शासनाने तीन महिन्यांचे थकीत वेतन तत्काळ जमा करावे, अन्यथा मूकमोर्चा काढण्यात येईल आणि हजारो कर्मचारी रस्त्यावर उतरतील, असा इशारा उत्तम पाटील यांनी दिला.

14:53 November 09

नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे आक्रोश आंदोलन; प्रशासनाचा नोंदवला निषेध

गेल्या तीन महिन्यांपासून एसटी महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या वेतन अदा करण्यात आले नसल्याने आज या एसटी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या घरासमोर कुटुंबीयांना सोबत घेऊन आक्रोश आंदोलन केले आहे. प्रशासनाचा निषेध नोंदवत लवकरात लवकर वेतन अदा करण्यात यावे, अशी मागणी यावेळी या कर्मचाऱ्यांनी केली.

12:21 November 09

आमच्या हक्काचा पगार द्या! नागपुरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

दसरा गेला आता दिवाळी तोंडावर आली तरी सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा निकाली निघाला नाही. त्यामळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसले आहे. आज एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सहकुटुंब आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.  

11:27 November 09

जळगावात एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

ST employee suicide
एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

थकीत वेतन आणि इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आंदोलन सुरू आहे. याच दरम्यान, जळगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. जळगाव आगारात वाहक म्हणून सेवारत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आर्थिक विवंचनेतून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

10:36 November 09

राज्यातील एसटी स्टॅंड ओस पडले

एसटीच्या एक लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेचं आज राज्यभर आक्रोश आंदोलन होत आहे. त्यामुळे राज्यातील एसटी स्टॅंड ओस पडले आहेत.

10:29 November 09

कर्मचारी घरीचं आपल्या कुटुंबासह करणार आंदोलन

दिवाळी सणापूर्वी दोन महिन्याचे थकीत वेतन तसेच ऑक्टोबरचे देय वेतन, महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळावी म्हणून कर्मचारी घरी आपल्या कुटुंबासह आंदोलन करणार आहेत.

10:27 November 09

...नाहितर कर्मचारी संघटना न्यायालयात जाणार

 7 ऑक्टोबरपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन न झाल्यास उच्च न्यायालयात एसटी महामंडळाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचं संघटनांनी स्पष्ट केले आहे. 
 

09:22 November 09

एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतनासाठी आक्रोश आंदोलन

कल्पेश करकरे, प्रतिनिधी

मुंबई - महानगरपालिका, बेस्टमधील कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त अनुक्रमे रुपये 15 हजार 500 व 10 हजार 100 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. परंतु एसटी कर्मचारी राज्यभर अत्यावश्यक सेवेमध्ये काम करीत असूनही त्यांना ऑगस्ट 2020 पासून तीन महिन्यांचे वेतन अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष वाढला असून प्रलंबित वेतन आणि इतर आर्थिक लाभ मिळण्यासाठी आजपासून ते राहत्या घरी कुटुंबासह आक्रोश व्यक्त करणार आहेत.

कर्मचारी संघटना न्यायालयात जाणार

एसटीच्या एक लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेचं आज राज्यभर आक्रोश आंदोलन होत आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे पत्रक एसटी प्रशासनाने जारी केलं आहे. दरम्यान, कामगार करार आणि वेतन प्रदान कायद्याचा भंग केल्याबाबत औद्योगिक न्यायालयात दावा ठोकणार असल्याचा इशारा एसटी कामगार संघटनानी दिला आहे.

वेतन प्रदान अधिनियम 1936 या कायद्यातील कलम 5 अन्वये प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला अथवा 7 तारखेपूर्वी वेतन देणं बंधनकारक आहे. प्रत्येक महिन्यात वेळेवर वेतन न दिल्यास कलम 20 अन्वये फौजदारी गुन्ह्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन देण्याची कायदेशीर जबाबदारी एसटी महामंडळाची आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन न झाल्यास उच्च न्यायालयात एसटी महामंडळाच्या विरोधात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचं संघटनांनी स्पष्ट केले आहे. 

काय आहे कर्मचाऱ्यांचे म्हणणे?

दिवाळीसारखा महत्त्वाचा सण दोन दिवसांनी सुरू होत आहे. सणापूर्वी एसटी कामगारांना मागील दोन महिन्याचे थकीत वेतन, माहे ऑक्टोबरचे देय झालेले वेतन, महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळणे आवश्यक आहे. वास्तविक एसटी कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाचे वेतन नियत देय तारखेस देण्याची जबाबदारी एसटी प्रशासनाची असतांनाही प्रशासनाकडून एसटी कामगारांना नियत देय तारखेस वेतन दिलेले नाही. कोरोनाच्या कालावधीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कामगार काम करीत असूनही त्यांनी केलेल्या कामाचे वेतन त्यांना मिळत नसल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष वाढलेला आहे. दिवाळी सणापूर्वी दोन महिन्याचे थकीत वेतन तसेच ऑक्टोबरचे देय वेतन, महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळावी म्हणून कर्मचारी घरी आपल्या कुटुंबासह आंदोलन करणार आहेत.

कोरोना काळात एसटी कर्मचाऱ्यांनी कोरोना योध्याची भूमिका बाजावली

कोरोना काळात सर्व बंद असताना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी राज्यातील प्रत्येक कोपऱ्यात एसटी रवाना झाली. यात एसटी वाहक व चालक आपल्याला जीवाची बाजी लावून काम करत होते. पण इतकं काम करूनही त्यांना गेले तीन महिने पगारच मिळाले नाही. जगभरात कोरोना योध्यांचा सन्मान होत आहे. मात्र सेवा देऊन ही एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही.

Last Updated : Nov 9, 2020, 3:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.