ETV Bharat / state

Shraddha Murder Case : श्रद्धाच्या पाठीवर आफताबने सिगारेटने...; मित्राचा धक्कादायक खुलासा

author img

By

Published : Nov 25, 2022, 8:32 PM IST

श्रद्धा वालकर हिच्या हत्याकांडात (Shraddha Walkar Murder Case) आफताबबाबत नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. आफताबने श्रद्धावर अनेकदा अत्याचार (Aftab tortured Shraddha many times) केल्याचे श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडर याने उघड केले. आता श्रद्धाच्या कॉलेजच्या मित्राने आफताब आणि श्रद्धाबद्दल एक नवीन गोष्ट सांगितली (Rajat Shukla Statement) आहे. त्यामुळे खळबळ माजली (Shraddha and Aftab Relationship suspect) आहे. latest news from Mumbai, Mumbai Crime

Rajat Shukla Statement
रजत शुक्ला

मुंबई: वसईतील श्रद्धा वालकर हिच्या हत्याकांडात (Shraddha Walkar Murder Case) आफताबबाबत नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. आफताबने श्रद्धावर अनेकदा अत्याचार (Aftab tortured Shraddha many times) केल्याचे श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडर याने उघड केले. आता श्रद्धाच्या कॉलेजच्या मित्राने आफताब आणि श्रद्धाबद्दल एक नवीन गोष्ट सांगितली (Rajat Shukla Statement) आहे. त्यामुळे खळबळ माजली (Shraddha and Aftab Relationship suspect) आहे. latest news from Mumbai, Mumbai Crime

रजत शुक्ला

श्रद्धाला सिगारेटचे चटके : श्रद्धाचा मित्र रजत शुक्लाने एका वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, श्रद्धा वालकरने तिच्या एका मैत्रिणीला आफताबने सिगारेटचे चटके श्रद्धाच्या पाठीला दिल्याची माहिती दिली होती. हे कळताच आम्हाला खूप दुःख झालं होतं असं रजत म्हणाला. हे कळताच दिल्ली पोलिसांनी रजतला समन्स पाठवून जबाब नोंदवण्यास आज माणिकपूर येथे बोलावून घेतले आणि अर्धा तास रजतची चौकशी करण्यात आली.



श्रद्धा आणि मी विवा कॉलेजमध्ये बॅचमेट होतो : रजत शुक्ला म्हणाला की, “मास मीडिया कोर्सदरम्यान श्रद्धा आणि मी विवा कॉलेजमध्ये बॅचमेट होतो. दोघांनाही पत्रकार व्हायचे होते. आम्ही एकत्र थिएटरही केले. याशिवाय कॉलेजच्या इतर अनेक उपक्रमांमध्ये आम्ही भाग घ्यायचो. श्रद्धा खूप सक्रिय होती. तिच्यात एक वेगळाच स्पार्क होता. तिला न्याय मिळायला हवा. यासाठी मला जितके काही योगदान देता येईल मी देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती रजत याने दिली.


अन् श्रद्धाचा स्वभाव बदलत गेला : रजत पुढे म्हणाला, 2018 ला श्रद्धा बदलू लागली होती. तिच्या स्वभावात बदल झाला. तो आफताबमुळे झाला. 2019 मध्ये ती आफताबसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे समोर आले होते. सुरुवातीला आफताब आम्हाला सामान्य माणसासारखा वाटत होता. त्यानंतर श्रद्धा त्याच्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहू लागली आणि दोघेही वाशीला शिफ्ट झाले. त्यानंतर दोघांनी कामानिमित्त दिल्लीला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला होता.


मग श्रद्धा आपल्यापासून दूर गेली: रजत पुढे म्हणाला, दिल्लीत आल्यानंतर श्रद्धाचे आमच्यापासून दूर गेली आणि खूप अंतर वाढले. आमचा संपर्क कमी असायचा. त्यानंतर ती बेपत्ता झाल्यानंतर कोणतीही माहिती मिळू शकली नाही. आम्ही फक्त तिच्या सुरक्षित परतीसाठी देवाकडे प्रार्थना करत होतो.


हे प्रेम नाही : जेव्हा त्याला श्रद्धाच्या निर्घृण हत्येची माहिती मिळाली तेव्हा मी हादरून गेलो. तिच्या मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकून दिले. प्रेमकथा अशी कधीच नसते. हा खूप मोठा गुन्हा आहे. आफताबच्या मनात काय होते ते समजण्यापलीकडचे आहे. श्रद्धाला न्याय मिळावा अशी आमची इच्छा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.