ETV Bharat / state

Jitendra Awhad on CM : मासिक पाळीचे रक्त तंत्र विद्यासाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार; जितेंद्र आव्हाडांची सरकारवर टीका

author img

By

Published : Mar 10, 2023, 3:43 PM IST

Updated : Mar 10, 2023, 4:22 PM IST

मासिक पाळी आलेल्या महिलेचे रक्त तंत्रविद्येसाठी वापरल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. महाराष्ट्रात समाज सुधारकांच्या भूमिकेचा, संस्कारांचा, संस्कृतीचा अवमान करणारा करणारी घटना असल्याची प्रतिक्रिया विविध सामाजिक संघटनानी व्यक्त केली आहे. सरकारने तंत्रमंत्र मंडळ स्थापन करून त्यात गलिच्छ मानसिकतेच्या लोकांना स्थान द्यावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Jitendra Awhad Criticism Shinde
Jitendra Awhad Criticism Shinde

जितेंद्र आव्हाडांची सरकारवर टीका

मुंबई : मासिक पाळी आलेल्या महिलेचे रक्त तंत्र विद्यासाठी वापरण्याचा पुण्यात निंदनीय प्रकार घडला आहे. महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या भूमिका, संस्कार, संस्कृतीला अपमानास्पद आणि अपमानित करणारा आहे. सरकारने तंत्र मंत्र मंडळ स्थापन करून त्या घाणेरड्या मानसिकता असलेल्या लोकांना त्यात स्थान द्यावे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला.


मासिक पाळीतील रक्ताचा तंत्रविद्यासाठी वापर : रक्त पुण्यात अतिशय लाजिरवाणी आणि घृणास्पद घटना समोर आली आहे. स्त्रीच्या मासिक पाळीतील रक्त कापसाने बाटली करून तंत्रविद्यासाठी उपयोग करण्यात आला आहे. महिलेवर यावेळी मारहाण करण्यात आली. तिचा छळ करण्यात आला. हा प्रकार निंदनीय आहे. महाराष्ट्रात यापूर्वी असा कोणताही प्रकार घडला नव्हता. सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिन साजरा करत असताना असा प्रकार घडला आहे. महाराष्ट्राला अपमानित, महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या भूमिकेला संस्कार, संस्कृतीला अपमानित करणारा प्रकार आहे. असा हल्लाबोल विरोधकांनी सरकारने केला आहे.

जितेंद्र अव्हाडांची टीका : त्यात एक तंत्रविद्या महामंडळ स्थापन करावा, त्यामध्ये अशा विकृत घाणेरड्या मानसिकता असलेल्या लोकांना स्थान द्यावे, असा खोचक सल्ला आव्हाड यांनी राज्य सरकारला दिला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने विविध मंडळांची घोषणा केली. हे सरकार तंत्र, मंत्रांवर विश्वास ठेवणारे आहे, अशी प्रतिमा त्यातून तयार केली आहे. त्यामुळे वेगळी अपेक्षा काय करणार, असे आव्हाड म्हणाले.



खत घेण्यासाठी जातीचे माहिती देणे सक्तीचे : सांगलीमध्ये खत घेण्यासाठी जातीचे माहिती देणे सक्तीचे करण्यात आले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यावरून ही सरकारवर टीका केली. सभागृहात सनातन धर्म की जय अशी घोषणा दिली जाते, तेव्हा महाराष्ट्रात हे सरकार जाती धर्मावर चालते, गृहीत धरले जाते. सनातन धर्म हा जातीभेद, वर्ण व्यवस्थेला पुष्टी देणार आहे. यातून हे घडणारच होते, असे आव्हाड यांनी सांगितले.



कठोर कारवाई करा, आमदार भुसारा : शिंदे फडणवीस सरकार हे जनतेचे राज्य आहे. धर्माचे, सर्वसामान्नयांचे राज्य आले, असे सांगण्यात येते. आता सरकारमध्ये अशा प्रकारे जात मागणे निंदनीय, अशोभनीय आहे. तुमच्या माझ्या महाराष्ट्राला हे चांगले नाही. सरकारच्या या निर्णयाचा निषेध करतो. ज्यांनी हे केले त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा यांनी केली.

हेही वाचा - Imtiaz Jalil: विना परवानगी कँडल मोर्चा; खासदार जलील यांच्यासह नागरिकांवर गुन्हा दाखल

Last Updated : Mar 10, 2023, 4:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.