ETV Bharat / state

Mumbai Air Pollution : मुंबईच्या हवेवरुन आदित्य ठाकरे-आशिष शेलारांमध्ये जुंपली; वाचा, कोणाची निघाली हवा

author img

By

Published : Jan 28, 2023, 7:05 PM IST

मुंबईतील हवेची पातळी सातत्याने घसरत चाललेली आहे. देशातील सर्वाधिक दूषित वातावरण हे मुंबईतले असल्याचे गेल्या काही दिवसापासून सांगण्यात येत आहे. आता यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. राज्यात वाढणाऱ्या प्रदूषणाबाबत देखील राज्य सरकार ओके आहे असे म्हणत ट्विटरच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे. याला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईच्या वायु प्रदूषणावर आदित्य ठाकरे यांना उशिरा जाग आली असल्याचे शेलार यावेळी म्हणाले.

ashish shelar aaditya thackeray
आशिष शेलार आदित्य ठाकरे

मुंबई - गेल्या तीन महिन्यापासून मुंबईतील हवेचा निर्देशांक सातत्याने कमी होत चालला आहे. मुंबई आणि एमएमआर विभागात हवेची गुणवत्ता वाईट आणि अत्यंत वाईट अशी नोंदवली जात आहे. यातच वाढत्या थंडीमुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर या सर्वांचा परिणाम होत आहे. या विरोधात अनेकजण आवाज उठवत आहेत, आपणही याबाबत सातत्याने बोलत आहोत. मात्र, राज्य सरकार राज्याच्या आणि मुंबईच्या वाढत्या प्रदूषणाबाबत गप्प आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे.

आदित्य ठाकरेंची टीका - वाढत्या प्रदूषणाबाबत देशातील अनेक राज्यांनी नियमावली तयार केली. मात्र, प्रदूषणाबाबत राज्य सरकारने अद्यापही कोणतीही नियमावली तयार केलेली नाही. मुंबई आणि महाराष्ट्रातील शाळा कॉलेज किंवा इतर शैक्षणिक संस्थेबाबत नियमावली तयार करणे गरजेचे आहे. मात्र, राज्य सरकारने नियमावली तयार केलेली नाही. याउलट मुंबईत मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहेत. सामान्य नागरिकांच्या आरोग्याकडे सरकार कानाडोळा करत आहे, असे आपल्या ट्विटमधून आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आपण पर्यावरण मंत्री असताना सोलापूर, मुंबई, पुणे अशा अनेक महत्त्वाच्या शहराचे क्लायमेट चेंज ॲक्शन प्लॅनमध्ये सहभागी झालो होतो. यासाठी त्यावेळच्या महाविकास आघाडी सरकारने काही प्लॅनही तयार केले होते. मात्र, आता याबाबत राज्य सरकार काही ठोस पावले उचलत नाही, असे या ट्विटमधून आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

  • As minister for environment & cc, I had been a part of the process to make Climate Action Plans for Mumbai, Pune, Solapur etc, which now seem to have been shelved.
    Our MCCC, EV policy, MCAP, dust mitigation measures seem to have been put away.
    The govt must speak and act. Now.

    — Aaditya Thackeray (@AUThackeray) January 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबईच्या हवेची पातळी घसरली - गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेची पातळी सातत्याने ढासळत आहे. हवेचा दर्जा वाईट आणि अत्यंत वाईट अशा स्वरूपाचा दिसून येत आहे. याचा परिणाम सातत्याने मुंबईकरांच्या आरोग्यावर होत आहे गेल्या काही दिवसापासून सर्दी, खोकला आणि अंगदुखी सारख्या आजाराने मुंबईकर त्रस्त झाले आहेत. वाढत्या प्रदूषणाचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होताना पाहायला मिळत आहे.

  • मुंबईत वायू प्रदूषण होत आहे, याबाबत मी राज्य सरकारला पत्र लिहिल्यानंतर आदित्य ठाकरे यांना उशिरा शहाणपण सुचले आहे. आदित्य ठाकरे वराती मागून घोडे घेऊन आले आहेत. तुम्ही दिलेल्या बांधकामाच्या बेसुमार परवानग्यामुळे हवेत धूळ निर्माण झाली आहे. @AUThackeray @BJP4Mumbai @Dev_Fadnavis pic.twitter.com/tX1rZcI8Hc

    — Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर टीका - मुंबईची हवेची पातळी सातत्याने खराब आणि अति खराब होत असल्याने आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांना टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही. मुंबईच्या वायु प्रदूषणावर आदित्य ठाकरे यांना उशिरा जाग आली. मुंबईच्या वाढत्या प्रदूषणामुळे आपण सरकारला चार दिवसापूर्वीच पत्र लिहिले आहे. यामध्ये मुंबईच्या वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली होती. हे पत्र आपण लिहिल्यामुळेच आदित्य ठाकरे यांना खडबडून जाग आली आणि आता त्यांनी मुंबईच्या प्रदूषणाबाबत ट्विट करायला सुरुवात केली आहे. उलट महाविकास आघाडी सरकार असताना भरमसाठ बांधकाम करण्यासाठी परवानगी दिल्यामुळेच आज मुंबईची अशी परिस्थिती झाली असल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केला आहे. त्यामुळे प्रदूषणाच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरे यांचे वरातीमागून घोडे म्हणत शेलार यांनी टीका केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.