ETV Bharat / state

शरद पवार, अजित पवार यांच्यावर टीका; मात्र उध्दव ठाकरेंकडून 'आरे'चा उल्लेखही नाही

author img

By

Published : Oct 8, 2019, 9:38 PM IST

Updated : Oct 8, 2019, 11:40 PM IST

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील शिवाजी पार्क येथे शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

उध्दव ठाकरे

मुंबई - दरवर्षीप्रमाणे शहरातील शिवाजी पार्क येथे शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सध्या आरेमधील वृक्षतोडीवरून राज्यात गोंधळ सुरू आहे. या पार्श्वभूमिवर शिवसेना काय भूमिका घेणार याचीही उत्सुकता होती. मात्र, सपूर्ण कार्यक्रमात आरेबद्दल एकही शब्द उच्चारला गेला नाही. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी आमचे सरकार आले तर आरेला जंगल घोषीत करू, वृक्षतोड करणाऱ्यांना पाहून घेऊ, असे म्हणणाऱ्या शिवसेनेने तलवार म्यान केल्याची चर्चा रंगत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राम मंदिर निर्माणाचा उल्लेख केला.

विधानसभेच्या प्रचाराचे बिगुल वाजवत शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधकांवर खरपुस टीका केली. जे शस्त्र विरोधकांनी शिवसेनेवर उगारले त्याच शस्त्राने तुम्हाला संपवले, असे ठाकरे म्हणाले.

अजित पवारांवर टीका करताना उध्दव ठाकरे म्हणाले, मगरीच्या डोळ्यात अश्रू हे ऐकले होते. परंतु, अजित पवारांच्या रूपाने मी ते अश्रू पाहिले. राजकारण सोडून शेती करणार बोलता. अजित पवार तुमच्या डोळ्यात पाणी आहे, पण धरणात पाणी नसणार तर काय करणार? तुमच्या कर्माने तुमच्या डोळ्यात पाणी आलेले आहे असे ते म्हणाले.

प्रत्येक निर्णय घेताना माझ्या मनात एकच विचार असतो की माझ्या शिवसैनिकाला काय वाटेल. तुम्ही ठेवलेला विश्वासाबद्दल मी मनापासून शिवसैनिकांचे आभार मानतो. सुडाचे राजकारण जर कोणी करायला गेले तर त्याला तोडून मोडून ठेवल्याशिवाय राहणार नाही.

शिवसेनाप्रमुख स्वतः कोर्टात हजर झाले आणि कोर्टाने सांगितले की, ही केसच होऊ शकत नाही. मागील सर्व अनुभव पाहून मी का बरे भाजप सोबत युती करायची नाही? राम मंदिर पूर्ण करण्याचे काम शिवसेना करणार. शिवसेनाप्रमुखांचे विचार आज पुर्ण जगाला पटायला लागले आहेत. ट्रम्प यांना शिवसेनाप्रमुखांचा पवित्रा कळला की भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत असे ठाकरे म्हणाले.

Intro:Body:mh_mum_shivsena_ud1_dasera_melava_pointers_mumbai_7204684

शिवसेनेच्या मंत्र्यांच कार्य अहवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू
या देशातील एकमेव संघटना समाजकारण व राजकारण करते ती म्हणजे शिवसेना
या देशातील एकमेव संघटना समाजकारण व राजकारण करते ती म्हणजे शिवसेना
विजया दशमीच्या दिल्या सर्वांना शुभेच्छा
इथली शस्त्र पूजा झाली शिवसेनकांना संबोधलं शस्त्र
भगवा फडकवण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालोय
एका महिन्यात 2 दशमी आजची व 24 तारखेला निवडणूकीचा निकाल लागल्यावर होणार

या शिवसेनेने भगवा दिलाय आणि तो रंग घेऊन मी पुढे निघलो

कोर्टाला दसऱ्याची सुट्टी असते, 15 दिवसानंतर दिवाळी येते, त्या दिवशी पण कोर्टाला सुट्टी असते
राम जन्मले होते की नाही यावर वाद चालू आहे

असं कुठेच जगात चाललं नसेल

या महिन्यात कोर्टाने निकाल दिला तर आनंद आहेच

आम्हाला या देशात राम मंदिर पाहिजे

एकवचनी पाहिजे

शिवसेना भाजप युती आहे


आमचा कारभार प्रभू रामचंद्र सारखा आहे

राम मंदिर बांधायचं आणि वचन तोडायचे हे आम्हाला पटत नाही


धनुष्यबाण निशाण घेतलं तेव्हा राम मंदिर हा विषयही नव्हता
आपल्या देशावर प्रेम करणारे मुसलमान देखील आहेत

धनगरांची काठीला आता तलावरची धार असली पाहिजे
नाथड्याच्या माथी काठी हाना
सत्ता तर मला कोणत्याही परिस्थितीत पाहिजेच उध्दव ठाकरे


युती केली म्हणजे शिवसेना झुकली अशी नाही

मराठाला आरक्षण दिल तस धनगर आदिवासी समजला आरक्षण द्या

मोगल संपूर्ण देश हिरवा करत होते तेव्हा शिवरायांनी सर्वत्र भगवा निर्माण केला

आजही आमची मागणी आहे की विशेष कायदा करून राम मंदिर बांधा

प्राण जाये पण वचन न जाये ही शिवसेनेची नीती


Conclusion:
Last Updated : Oct 8, 2019, 11:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.