ETV Bharat / state

फेरीवाल्यांकडून जमा केली जातेय खंडणी, मनसेचा सेनेवर गंभीर आरोप

author img

By

Published : Feb 4, 2021, 1:26 PM IST

Updated : Feb 4, 2021, 1:39 PM IST

जेवढे विरप्पनने लोकांना लुटले नसेल त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटले आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल, असे ट्विट दोन दिवसांपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले होते. त्यानंतर गुरुवारी (दि. 4 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेत मनसेने शिवसेनेचा कारनामा उघड केला आहे. नेमका काय आहे कारनामा हे जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण बातमी..

पावती दाखवताना
पावती दाखवताना

मुंबई - मुंबईत शिवसेना फेरीवाल्यांकडून खंडणी उकळत असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी गुरुवारी (दि. 4 फेब्रुवारी) केला आहे. विक्रोळी या भागात फेरीवाल्यांकडून रोज दहा रुपये घेतले जात आहेत आणि त्याची पावती त्यांना दिली जात आहे. त्या पावतीवर बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह स्थानिक आमदार सुनील राऊत आणि स्थानिक नगरसेवक उपेंद्र सावंत यांचेही फोटो आहेत. पोलीस आणि बीएमसीचा त्रास होऊ देणार नाहीत, असे सांगून ही खंडणी उकळली जात असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला. म्हणून यांना विरप्पण गॅंग म्हटले होते, असा टोलाही देशपांडे यांनी लगावला आहे.

संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत करताना प्रतिनिधी

याबाबत मुंबई पोलिसांना भेटून सविस्तर तक्रार देणार असल्याचे संदीप देशपांडे म्हणाले. पोलिसांनी या खंडणीखोरांवर त्वरित कारवाई करावी. महापालिकेतील कोण या प्रकरणात सामिल आहेत याची चौकशी व्हावी, अशी मागणी देशपांडे यांनी केली आहे.

पावती दाखवताना
पावत्या

हेही वाचा - चंदा कोचर आणि दीपक कोचरसह 11 जणांच्या विरोधात विशेष न्यायालयात चालणार खटला

Last Updated : Feb 4, 2021, 1:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.