ETV Bharat / state

Shinde Group : गाव तिथे शाखा अन् शाखा तिथे शिवसैनिक; शिंदे गटाची नवी योजना

author img

By

Published : Feb 2, 2023, 4:28 PM IST

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे गटला मोठा फटका बसेल, असे सी व्होटरच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. भाजप आणि शिंदे गटांमध्ये धाकधूक वाढले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मुंबईत आज शिंदे गटाच्या आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली. दरम्यान, गाव तिथे शाखा, शाखा तिथे शिवसैनिक ही संकल्पना राबवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

Shinde Group
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाच्या दालनात आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचे सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. अशातच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने शिंदे गटाच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यांच्या मनधरणीसाठी आज नंदनवन या शासकीय निवासस्थानी शिंदे गटाच्या नेत्यांची बैठक होणार असल्याचे संगण्यात आले होते. त्यानुसार, आमदार मंत्री दीपक केसरकर, गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज ही बैठक झाली. बैठकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेची आगामी रणनीती ठरवण्यावर चर्चा करण्यात आल्याचे आमदार मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे.

५०० दवाखाने सुरू करणार : मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्हाप्रमुख, आमदार, खासदार, संपर्क प्रमुखांची अंगीकृत संघटनांची आज बैठक पार पडली. बैठकीत जिल्हा, तालुका स्तरावर कार्यालय सुरू करावे. गाव तेथे शाखा, शाखा तिथे शिवसैनिक ही संकल्पना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पदाधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत. जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी नरिमन पॉईंट येथील बाळासाहेब भवन येथे दर आठवड्याला मंत्र्यांनी जनता दरबार घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, येत्या (दि. 9 फेब्रुवारी)रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे ग्रामीण भागात या दिवशी ५०० दवाखाने सुरू करणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

कोकण शिक्षक मतदारसंघात आघाडीची छुपी मदत : कोकण शिक्षक मतदार संघात ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला. हा लोकांचा कौल आहे. महाविकास आघाडीतील छुप्या मदतीचा देखील यात समावेश आहे. अशा मदती आगामी काळातील होत राहतील, असे गुलाबराव पाटील म्हणाले. तर कोकणाने नेहमीच भगव्याची शान राखली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. उमेदवारांचे सबंध आणि छुपी मदत म्हणजे हे यश प्राप्त झाले, अशी प्रतिक्रिया आमदार भरत गोगावले यांनी दिली. महाविकास आघाडीच्या आमदारांकडून होणाऱ्या पैसे वाटपाच्या आरोपाचा ही गोगावले यांनी समाचार घेतला. ज्ञानेश्वर म्हात्रे गेल्या सहा वर्षापासून प्रयत्न करत होते. त्यांची ही मेहनत या निवडणुकीत सार्थ ठरल्याचे गोगावले म्हणाले आहेत.

खोक्याचे आरोप करणाऱ्या बोक्याना चपराक : कोकण शिक्षक मतदार संघाच्या निकालामुळे खोक्याचे आरोप करणाऱ्या बोक्यांना या निवडणुकीने चपराक दिली आहे, असा तोला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी लगावला आहे. पदवीधर निवडणुकीतही सुशिक्षित मतदार आमच्या सोबत आहेत, हे या निकालातून दिसून येणार आहे हा विजय यशाची नांदी आहे. बाळाराम पाटील यांच्या विषयासाठी अनेकजण प्रयत्न करत होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री केलेल्या कामामुळे हे यश प्राप्त झाले आहे. विरोधकांनी यातून बोध घ्यावा असा सल्ला म्हस्के यांनी दिला आहे.

हेही वाचा : अदानी समूहाच्या वेगवान व्यवसायाला धक्का देणार्‍या 'अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हर'ची कहाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.