ETV Bharat / state

Aaditya Thackeray in Vajramuth Sabha : लवकरच शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल- आदित्य ठाकरे

author img

By

Published : May 1, 2023, 10:14 PM IST

शिंदे-फडणवीस सरकार येत्या काळात कोसळेल. राज्याच्या मंत्रिमंडळात महिला मंत्री नाहीत, हे सरकार बिल्डर आणि कंत्राटदारांचे आहे, असे मी तुम्हाला लेखी देत आहे, असे महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. मुंबईतील बीकेसी येथे आज (सोमवारी) आयोजित वज्रमूठ सभेत ठाकरे बोलत होते.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई: 'जय महाराष्ट्र' म्हणत आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली. मंचावर उपस्थित असलेल्या नेत्या आणि नेत्यांचे आणि संविधान रक्षक यांचे स्वागत करतो. आमच्याकडे खुर्च्या रिकाम्या दिसत नाही. या सभेत सर्व संविधान रक्षक म्हणून आपण सर्व इथे जमलो आहोत. जेव्हा वज्रमूठ सभेसाठी बैठका झाल्या तेव्हा ही सभा 1 मे रोजी मुंबईला व्हावी, असा आपण हट्ट धरला होता. आज काय परिस्थिती आहे. राज्य 9 ते 10 महिन्यात अंधारात गेले, त्यातून राज्याला बाहेर काढायचे आहे. हे घटनाबाह्य सरकार असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली.

  • Maharashtra | I am giving you in writing that the state govt will collapse in the coming days, there are no women ministers in the cabinet, and this govt is of builders and contractors: Former Maharashtra Minister Aaditya Thackeray pic.twitter.com/r5a5eV1qHZ

    — ANI (@ANI) May 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आदित्य ठाकरेंच्या भाषणाने सभेला सुरुवात: छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आज मुंबईत तिसरी वज्रमूठ सभा घेतली जात आहे. या सभेला आज विशेष महत्त्व आहे. कारण आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस आहे. त्यामुळे या सभेत संबोधित करताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचे आजचं भाषण महत्त्वाचे मानले जात होते. वज्रमूठ सभेच्या सुरुवातीला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सर्वप्रथम या सभेला संबोधित केले. यावेळी मुंबई ही दिल्लीसमोर कधीही झुकणार नाही, असे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले.

मुंबईला मोडण्याचा भाजपचा मनसुबा: आतापर्यंत जे सरकार सत्तेत होते त्यांनी कधी मुंबईला झुकवण्याचे काम केले नाही किंवा मुंबईला मोडण्याचे काम केले नव्हते; पण या सरकारचा स्पष्ट मनसुबा आहे की मुंबईला महाराष्ट्रापासून मोडायचे. मुंबईला दिल्ली समोर झुकवायचे आहे. मी इशारा देतो, तुम्ही आम्हाला झुकवायला निघालात तर हा महाराष्ट्र तुम्हाला मोडेल पण वाकणार नाही. झुकणार नाही, अशा इशाराच आदित्य ठाकरेंनी मोदी आणि शिंदे सरकारला दिला.

वज्रमूठ सभेत भेदभाव नाही: वज्रमूठ सभेत कुठल्याही पक्षाचा, धर्माचा भेदाभेद दिसत नाही. जातीचा भेदभाव दिसत नाही. इथे आम्ही सगळे संविधान रक्षक म्हणून एकत्र आलेलो आहोत. सगळे संविधान रक्षक माझ्यासमोर बसलेले आहेत, असे शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे म्हणाले. आजची तारीख आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. जेव्हा महाविकास आघाडीच्या सभा कुठे कुठे करायच्या हे ठरत होतं तेव्हा मी हट्ट धरला की 1 मे ची सभा ही आपल्या मुंबईत झाली पाहिजे. ही सभा महाराष्ट्राच्या राजधानीत झाली पाहिजे आणि तशी आज सभा होत असल्याचे समाधान ठाकरेंनी व्यक्त केले.

40 गद्दार गेले कुठे?: आता कळले की, गुजरातला का सर्व प्रकल्प जात आहे. एकच दिवस गुजरात आणि महाराष्ट्र जन्मदिन; मात्र केंद्रकडून गुजरात सरकारला जास्त पाठबळ दिले जात आहे. गुजरातला दोन मुख्यमंत्री एक तिकडे आपल्या एक खरे असे मला वाटते. मुंबई पालिका ठेवी मोडायला निघाले आहे. आम्ही झुकणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आभार मानतो; कारण गद्दारांनी सोडून गेल्यानंतर तुम्ही सर्वांनी साथ दिली त्याबद्दल जाहीर आभार मानतो, असे शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे म्हणाले.

हेही वाचा: Sanjay Raut in Vajramuth Sabha : मुंबई आमच्या बापाची, कोणीही महाराष्ट्रपासून तोडू शकणार नाही; संजय राऊतांचा केंद्राला इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.