ETV Bharat / state

Ambadas Danve: शिंदे- फडणवीस सरकारचा माज शिवसैनिक उतरवतील; अंबादास दानवेंचा इशारा, नवी मुंबईत भव्य मोर्चा

author img

By

Published : Oct 19, 2022, 5:13 PM IST

Ambadas Danve: शिंदे फडणवीस सरकार Shinde Fadnavis government आणि पोलिसी दंडुकेशाही विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray पोलीस आयुक्तालयावर धडक मोर्चा Strike march on Police Commissionerate काढला. सदर मोर्चाला सकाळी 11 च्या दरम्यान सीबीडी बेलापूर येथील सीएनजी पंपाजवळ असलेल्या मैदानात मेळाव्याच्या स्वरूपात सुरुवात झाली.

Ambadas Danve
Ambadas Danve

नवी मुंबई शिंदे फडणवीस सरकार Shinde Fadnavis government आणि पोलिसी दंडुकेशाही विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray पोलीस आयुक्तालयावर धडक मोर्चा Strike march on Police Commissionerate काढला. सदर मोर्चाला सकाळी 11 च्या दरम्यान सीबीडी बेलापूर येथील सीएनजी पंपाजवळ असलेल्या मैदानात मेळाव्याच्या स्वरूपात सुरुवात झाली. तेथून हा मोर्चा जुने पालिका मुख्यालय मार्गाने पोलीस आयुक्तालयावर गेला. पोलीस आयुक्तांना निवेदन देत या मोर्चाची सांगता झाली. शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, नेते भास्कर जाधव, खासदार राजन विचारे यांच्यासह ठाणे नवी मुंबईतील अनेक सेना पदाधिकारी उपस्थित होते. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक या मोर्चात सहभागी झाले होते. शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करणे, तडीपारी करणे, शिंदे गटात प्रवेशासाठी दबाव टाकणे, खंडणी मागणे अशा पोलिसांच्या गैरकारभार विरोधात सदर मोर्चा काढण्यात आल्याची माहिती सेना नेत्यांनी दिली आहे.

शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत आमच्यावर पोलिसी दबाव बनवला जात आहे. हा आमचा पहिला धडक मोर्चा असून असे अनेक मोर्चे ठिकठिकाणी निघणार असल्याची माहिती शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. यावेळी नितेश राणेंवर सडकून टीका करताना भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल करता, मग त्या दिवट्याने अकेलेचे तारे तोडले आहेत. त्याच्यावर काहीच का होत नाही, असा सवाल देखील राऊत यांनी उपास्थित केला आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलिस ठाण्यामध्ये गोळीबार करतात. एक आमदार हातपाय तोडण्याची भाषा करतो, त्यांना काहीच होत नाही. आमच्या निर्दोष शिवसैनिकांवर नाहक गुन्हे दाखल केले जातात. हे आता सहनशीलतेच्या पलीकडे गेले असल्याचे राऊत म्हणाले.

अंबादास दानवे, विरोधी पक्ष नेते शिंदे फडणवीस सरकार सूडबुद्धीने, बदलाच्या भावनेने काम करत आहे. पोलिसांना हाताशी धरून शिवसैनिकांवर राज्यभरात खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. शिंदे सरकारला सत्तेचा माज आहे, हा माज जनतेच्या मदतीने शिवसैनिक उतरवल्या शिवाय राहणार नाहीत. महाराष्ट्र पोलिसांचे जगभरात नाव आहे. पोलिसांनी आपली प्रतिमा मलीन करू नये, असे देखील दानवे म्हणाले. या प्रकरणी नागपूर अधिवेशनात आपण आवाज उठवणार असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.

शिवसेना नेते, भास्कर जाधव मी तत्वाने काम करणारा माणूस आहे. गृहखाते फडणवीस यांच्याकडे आहे. गृहखात्याकडूनच माझे संरक्षण काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्हाला मारून, धमकावून, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलिसांची धाड हे सगळं करून जर तुमचा पक्ष मोठा होणार असेल, तर खुशाल आमच्यावर हल्ले करा. मी घाबरणाऱ्यातला नाही, असे जाधव म्हणाले. राणेंबाबत बोलताना राणे यांनी राजकीय संस्कृतीच्या बाता मारू नये. महाराष्ट्रातील संस्कार, संस्कृती आणि राजकीय परंपरेला तिन्ही राणेंनी तिलांजली दिली, असल्याचे भास्कर जाधव म्हणाले आहेत.

खासदार राजन विचारे शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आलेल्या मिंधे गट आणि भाजप सरकारने महाराष्ट्राची अवस्था बिहारसारखी करून ठेवली आहे. मिंधे गटात जाण्यास नकार देणाऱ्या मातोश्रीच्या निष्ठावंत शिलेदारांची पोलीस बळाचा गैरवापर करून छळवणूक सुरू करण्यात आली आहे. या गुंडगिरीचा कडाकडून विरोध करण्यासाठीच हा धडक मोर्चा काढण्यात आल्याचे राजन विचारे म्हणाले. गेल्या अडीच महिन्यांत आपण महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये हेच कळत नाही. मिंधे गटात जाण्यास नकार देणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांवर पोलीस धमक्या देऊन कारवाई करत आहेत. एम. के. मढवी यांना तडीपार करण्याची धमकी देण्यात आली होती.

त्यानंतर धमकीप्रमाणेच पोलिसांनी कारवाई केली आहे. उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर यांच्यावरही मिंधे गटात सहभागी होण्यासाठी दबाव आणला जात आहे. खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी त्यांनाही दिली जात आहे. ईडी सरकारचे पोलीस इंग्रजांच्या पोलिसांना लाजवेल, असे काम करत आहे. एकीकडे मिंधे गटाच्या बगलबच्च्यांना खिरापतीसारखे पोलीस संरक्षण दिले जात असताना शिवसेनेच्या निष्ठावंतांचे पोलीस संरक्षण मात्र काढण्यात आले आहे. 4 दिवसांपूर्वी माझेही पोलीस संरक्षण कमी करण्यात आले असल्याची माहिती विचारे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.