ETV Bharat / state

Mumbai Airport : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व्हर डाऊन

author img

By

Published : Dec 1, 2022, 6:47 PM IST

Updated : Dec 1, 2022, 8:13 PM IST

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport) सर्व्हर डाऊन असल्याने गर्दी झाली आहे. मात्र, गर्दीचे व्यवस्थापन व्यवस्थित केले जात आहे. मॅन्युअल पास दिले जात असल्याने गोंधळ नाही, अशी माहिती मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीआयएसएफने दिली आहे. (Server down at Mumbai International Airport)

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व्हर डाऊन
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व्हर डाऊन

मुंबई : येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व्हर डाऊन (Server down at Mumbai International Airport) असल्याने गर्दी झाली आहे. मात्र, गर्दीचे व्यवस्थापन (crowd Management) व्यवस्थित केले जात आहे. मॅन्युअल पास दिले जात असल्याने गोंधळ नाही, अशी माहिती मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीआयएसएफने (CISF) दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात विविध विकासकामे असल्यामुळे आज विमानतळाच्या सर्वरला त्याचा फटका बसला आणि विमानतळावरील इंटरनेट सर्वर काही काळ डाऊन झाले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा फटका बसला

मॅन्युअल प्रक्रिया : सीआयएसएफने (CISF) सांगितले की, आमची प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी चेक-इनसाठी अतिरिक्त वेळ द्यावा. त्यांच्या संबंधित एअरलाइन्सशी संपर्क साधावा, शहरात सुरू असलेल्या विकासामुळे विमानतळाबाहेर तात्पुरते नेटवर्क व्यत्यय आल्याने अडचण आली आहे. मात्र, त्यामध्ये लवकरच सुधारणा होईल. या समस्येवर उपाय करण्यासाठी आमची टीम कार्यरत आहे. सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी मॅन्युअल प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत असेही व्यवस्थापनाने म्हटले आहे. आमच्या प्रवाशांनी समजून घेतल्याबद्दल त्यांचे आभारही व्यवस्थापनाने मानले आहेत.

काय प्रकरण ? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अत्यंत गजबजलेले असते. या विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये विविध विकासकामे सुरू आहे त्या विकास कामांमध्ये जमिनीच्या खालून भुयारी वेगवेगळ्या केबल मोठ्या गटारीचे खोदकाम करणे ,रस्ते दुरुस्ती करणे, रस्त्यांची खोदकाम करणे यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्यापा सर्वर ला जोडलेल्या केबलला धक्का लागला. त्यामुळे काही काळ विमानतळाचे संगणक सर्वर डाऊन झाले.

Last Updated : Dec 1, 2022, 8:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.