ETV Bharat / state

Varavara Rao : कवी वरावरा राव यांना गडचिरोली न्यायालयात ऑनलाइन उपस्थित राहण्याची मुंबई सत्र न्यायालयाची परवानगी

author img

By

Published : Dec 26, 2022, 9:35 PM IST

Updated : Dec 26, 2022, 10:09 PM IST

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी ज्येष्ठ तेलगू कवी वरावरा राव ( Senior Telugu poet Varavara Rao ) यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टामध्ये ( Allowed by Session Court to Appear Online in Court ) गडचिरोली येथील एका खटल्यामध्ये ऑनलाइन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहण्याकरिता अर्ज केला ( Varavara Rao Accused in Bhima Koregaon Case ) होता. या अर्जावर विशेष न्यायाधीश राजेश जे. कटारिया यांनी निर्णय देत वरावरा राव यांना हजर राहण्याची परवानगी दिली. त्यामुळे वरावरा राव यांना दिलासा मिळाला आहे.

Senior Telugu poet Varavara Rao, accused in Bhima Koregaon case, allowed by session court to appear online in court at Gadchiroli
ज्येष्ठ तेलगू कवी वरावरा राव मुंबई सत्र न्यायालयात ऑनलाइन उपस्थित; गडचिरोली खटला प्रकरण

मुंबई : ज्येष्ठ तेलुगू कवी वरावरा राव यांना गडचिरोली येथील दुसर्‍या सत्र न्यायालयाच्या ( Senior Telugu poet Varavara Rao ) खटल्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची परवानगी ( Allowed by Session Court to Appear Online in Court ) मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने दिली ( Varavara Rao Accused in Bhima Koregaon Case ) आहे. गडचिरोलीतील एका प्रकरणात वरावरा राव हे आरोपी आहेत. राव यांनी गडचिरोली न्यायालयासमोर मुंबई न्यायालयाच्या सुविधेचा वापर करून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती.


एल्गार परिषद प्रकरणात बेकायदेशीर कृत्ये एल्गार परिषद प्रकरणात बेकायदेशीर कृत्ये कायद्याअंतर्गत 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील दोन आरोपी जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणातील सात आरोपींना 2018 पासून तर सहा जण 2020 पासून न्यायालयीन कोठडीत आहेत. जोपर्यंत त्यांच्याकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या क्लोन प्रती उपलब्ध करून दिल्या जात नाही तोपर्यंत न्यायालय खटला पुढे करू शकत नाही.



नेमके काय आहे प्रकरण मराठा सेना आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या युद्धाच्या 200 व्या स्मृतिदिनानिमित्त 31 डिसेंबर 2017 रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिवस प्रेरणा अभियान या कार्यक्रमाअंतर्गत अनेक दलित संघटनांनी एकत्रितपणे एका रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी बहुतांश दलित सैनिक होते. पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी दंगल झाली होती आणि त्या दिवशी इथे लाखोंच्या संख्येने दलित समुदाय जमा होतो. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते. 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेतील वक्तव्य कारणीभूत ठरले होते, अशा तक्रारीवरून पुणे पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला.

एल्गार परिषदेच्या मागे माओवादी संघटनांचा हात या एल्गार परिषदेच्या मागे माओवादी संघटनांचा हात होता, असे म्हणत या संघटनांशी कथित संबंध आहेत या संशयावरून पुणे पोलिसांनी देशभरातल्या विविध भागांतून डाव्या चळवळीशी संबंधित अनेकांना अटक केली. 28 ऑगस्ट रोजी पुणे पोलिसांनी गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, वरवरा राव, अरुण फरेरा आणि वरनॉन गोन्सालविस यांना अटक केली होती.

Last Updated : Dec 26, 2022, 10:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.