ETV Bharat / state

Sanjay Raut : 'सुरज परमार यांच्या डायरीतील 'इएस' कोण? एसआयटी चौकशी करण्याची संजय राऊत यांची मागणी

author img

By

Published : Dec 25, 2022, 1:01 PM IST

Updated : Dec 25, 2022, 1:19 PM IST

Sanjay Raut : उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांनी दिशाच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले ( Devendra Fadnavis orders SIT inquiry ) आहेत. त्यावर संजय राऊत आक्रमक झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांच्यावर गंभीर लावत भाजपकडून सूडबुद्धीचे राजकारण सुरू असल्याचे म्हटले आहे.

Sanjay Raut Allegations On Eknath Shinde
संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर आरोप

एसआयटी चौकशी करण्याची संजय राऊत यांची मागणी

मुंबई : Sanjay Raut : अभिनेता सुशांत सिंग राजपूतची सेक्रेटरी दिशा सालियन हिच्या मृत्यूचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत ( Disha Salian death Case ) आले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांनी दिशाच्या मृत्यूची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले ( Devendra Fadnavis orders SIT inquiry ) आहेत. दुसरीकडे, दिशाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाच्या पुन्हा चौकशीला विरोध केला आहे. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की दिशाच्या मृत्यूची आधीच बरीच चौकशी झाली आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील या चौकशीनंतर सत्ताधारी नेत्यांची विविध प्रकरण बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले ( Sanjay Raut Allegations On Eknath Shinde ) आहेत. राऊत आपल्या मुंबईतील निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.

म्हणूनच जुने विषय पुन्हा चर्चेत आणले : यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "इंटरपोलकडे जरी केस दिली तरी हरकत नाही. ज्या विषयाशी शिवसेना आणि आदित्य ठाकरेंचा काडीमात्र संबंध नाही ते महाराष्ट्रच्या विधानसभेत का काढले जातायत? महाराष्ट्र हिताचे सीमाप्रश्नाचे विषय का नाहीत चर्चेला येत? नेत्यांबद्दल शिवराळ भाषा वापरली जाते, आम्हाला देशद्रोही ठरवले जाते. आमचे मुख्यमंत्री दिशा सालियन आणि अन्य विषयात गुंतून पडलेत. नवे ते विषय काढायचे आणि छत्रपतींच्या अपमानाचा विषय, मुख्यमंत्री १६ भूखंडाचा व्यवहार, फुले आंबेडकरांचा अपमान यावरील लक्ष दुसरीकडे जावं यासाठीच हे जुने विषय पुन्हा उकरून काढले जात आहेत." असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

सुरज परमारच्या डायरीतील ES कोण? : "विरोधीपक्षाला बोलता येऊ नये त्यासाठी सर्व विषय काढायला लावलेत. छत्रपतींच्या अपमानाचा विषय महत्त्वाचा ठरत नसेल तर कोणत्या विषयाला प्राधान्य देता आहात? करा राज्यपालांविरोधात एसआयटी स्थापन. तुमच्या मंत्र्यांविरोधात एसआयटी स्थापन करतायत का? सुरज परमार यांची डायरी सापडली आहे, त्यात सांकेतिक नावं ( Suraj Parmar Diary ES Mentioning ) आहे, कोणाची आहे ते आम्हाला माहिती आहे. लावा चौकशी." असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.


एवढ्या सूडबुद्धीने वागणारे सरकार मी पाहिले नव्हते : पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "सर्वसामान्यांचा विषय उचलून धरण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते. शिवसेना संपवायची, या अजेंड्यावर सरकार आले आहे. राज्यपालांविरोधात एसआयटी करा तुम्ही. महाराष्ट्रात युगपुरुषांचा अपमान होतोय, एसआयटी सुरज परमार केसवर स्थापन व्हायला पाहिजे. तुम्ही राज्यपालांचे भजन गातायत. एवढ्या सूडबुद्धीने वागणारे सरकार मी पाहिले नव्हते. फडणवीस आणि शिंदे यांचं हायकमांड दिल्लीत आहे. त्यामुळे त्यांना जावं लागतं." अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

Last Updated : Dec 25, 2022, 1:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.