ETV Bharat / state

Raut Death Threat Call: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

author img

By

Published : Jun 9, 2023, 12:06 PM IST

Updated : Jun 9, 2023, 12:31 PM IST

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना कालपासून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. सुनील राऊत यांना धमकीचा फोन आला होता. मुंबईचे पोलीस आयुक्त आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

Raut Death Threat Call
संजय राऊत आणि सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते संजय राऊत यांना गोळ्या घालण्याची धमकी मिळाली आहे. संजय राऊत यांचे आमदार भाऊ सुनील राऊत यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला, ज्याने संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली. हे संभाषण जोरदार व्हायरल होत आहे. या संभाषणामध्ये ती व्यक्ती संजय राऊत यांना पत्रकार परिषद थांबवण्यास सांगत आहे आणि सहमत नसल्यास गोळ्या घालण्याची धमकी देत ​​आहे. यासोबतच संभाषणात दोन्ही बाजूंनी शिवीगाळही करण्यात आली आहे.

जीवे मारण्याची धमकी : आज सकाळीच शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे समोर आले होते, त्यानंतर आता या बातमीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या अगोदर देखील संजय राऊत यांना अनेकदा धमकीचे फोन आलेले आहेत. शरद पवार यांना 'राजकारण महाराष्ट्राचं' नावाच्या ट्विटर अकाऊंटवर ही धमकी दिली आहे. या धमकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या अगोदर 2022 मध्ये देखील शरद पवार यांना असाच धमकीचा फोन आला होता.

संजय राऊतांना यापूर्वीही धमकी : यापूर्वी एप्रिल महिन्यात संजय राऊत यांना धमकी आली होती. पुण्यातून एका तरुणाला या प्रकरणी ताब्यात घेतले गेले होते. राहुल तळेकर असे त्या तरूणाचे नाव होते. ८ जून रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास आता पुन्हा संजय राऊत यांना धमकी आली. फोन करणारा व्यक्ती हिंदीतून बोलत होता. त्याने संजय राऊतांना एका महिन्यात सकाळी ९ चा भोंगा बंद करायला सांगा. त्यासाठी एका महिन्याची मुदत देतो, अशी धमकी दिली आहे.

हेही वाचा :

  1. Sunil Raut on Shivsena : मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, कापला तरी प्रतारणा करणार नाही, सुनील राऊत यांचे स्पष्टीकरण
  2. Sanjay Raut Criticized Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस इतिहासातील सर्वात कमजोर गृहमंत्री- संजय राऊत
  3. Sanjay Raut in Shivsena melava : नेहमी मोदींचे नाव घेता, ते तुमचे बाप आहेत का सांगा - संजय राऊत
Last Updated : Jun 9, 2023, 12:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.