ETV Bharat / state

Cross-Examination of Sachin waze : सचिन वाझे यांची अनिल देशमुख यांच्या वकिलाकडून उलटतपासणी

author img

By

Published : Nov 30, 2021, 5:21 PM IST

शंभर कोटी वसुली प्रकरणात आज अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांच्या वकिलाकडून चांदिवाल आयोगासमोर सचिन वाझे ( Sachin Waze ) यांची उलट तपासणी करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांनी आज (दि. 30) चांदिवाल आयोगासमोर ( Chandiwal Commission ) सचिन वाझेची उलट तपासणी करण्यात यावी, यासाठी वकीलाच्या मार्फत अर्ज केला होता. या अर्जाला आयोगाने परवानगी देत आज सचिन वाझेची उलट तपासणी करण्यात आली आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

मुंबई - शंभर कोटी वसुली प्रकरणात आज अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांच्या वकिलाकडून चांदिवाल आयोगासमोर सचिन वाझे ( Sachin Waze ) यांची उलट तपासणी करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांनी आज (दि. 30) चांदिवाल आयोगासमोर ( Chandiwal Commission ) सचिन वाझेची उलट तपासणी ( Cross-Examination of Sachin Waze ) करण्यात यावी, यासाठी वकीलाच्या मार्फत अर्ज केला होता. या अर्जाला आयोगाने परवानगी देत आज सचिन वाझेची उलट तपासणी करण्यात आली आहे.

चांदिवाल आयोगासमोर आतापर्यंत सचिन वाझे यांची संजय पालांडे यांचे वकील शेखर जगताप यांनीही उलटतपासणी केली आहे. आज अनिल देशमुख यांच्या वकीलामार्फत उलट तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर आयोगाचे कामकाज उद्या (दि. 1 डिसेंबर) सकाळी 10.30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. उद्या पुन्हा सचिन वाझे यांची उलट तपासणी करण्यात येणार आहे.

अनिल देशमुख यांचे वकील अनिता कँस्टेलिनो यांनी सचिन वाझे यांच्याशी केलेली प्रश्नोत्तरे

प्रश्न - 13 मार्चला तुम्हाला एनआयएने अटक केली होती..?

उत्तर - हो, मला एनआयएने अटक केली होती.

प्रश्न - तुम्हच्यावर एनआयएमध्ये असताना दबाव होता..?

उत्तर - हो, माझ्यावर दबाव होता. तो माझा आयुष्यातला कठीण काळ होता. मी मानसिक तणावात होतो.

प्रश्न - या परिस्थतीत तुमचा जबाब एनआयएने नोंदवला..?

उत्तर - 28 दिवस एनआयएकडून मला त्रास दिला जात होता.

प्रश्न - तुमचा जबाबत काही सापडले नाही, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे का..? काही कागदपत्र किंवा पुरावे दिले गेले का..?

उत्तर - 3 मे, 2021 मी एनआयए न्यायालयात विनंती केली होती. त्यांनी माझ्याकडून अनेक कागदांवर जबरदस्ती सह्या घेतल्या. त्याची कॉपी मी मागितली, पण मला दिली नाही.

हे ही वाचा - Mamta Banerjee Mumbai Visit : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांची भेट नाहीच, आदित्य ठाकरेंची घेणार भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.