ETV Bharat / state

Antilia Bomb Scare Case : सचिन वाझेची सुटकेसाठी न्यायालयात धाव; साक्षिदार म्हणून तुरूंगवास भोगणे अन्यायकारक

author img

By

Published : Feb 22, 2023, 11:56 AM IST

Updated : Feb 22, 2023, 1:13 PM IST

Antilia Bomb Scare Case
सचिन वाझे

अँटलिया प्रकरणानंतर सचिन वाझेला अटक करण्यात आली होती. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयकडून ह्या प्रकरणांमध्ये आरोप ठेवला गेला होता. खटला जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत सुटका करावी यासाठी न्यायालयात धाव घेत असल्याचे सचिन वाझे याने म्हटले आहे.

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि दुसरे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे हे दोघे जामीनावर बाहेर आहेत. त्यामुळे सचिन वाजे याने सुटका मिळावी यासाठी याचिका केली. मात्र सीबीआयने सचिन वाझे याच्या या याचिकेला विरोध केला.


सीबीआयचा विरोध : सचिन वाझे याने सुटकेसाठी जी याचिका केली आहे. त्या याचिकेच्या विरोधात सीबीआयने आपल्या उत्तरात न्यायालयासमोर म्हणणे मांडले आहे की, सचिन वाझे याला जामीन पाहिजे आहे. मात्र ती याचिका न्यायालयासमोर ठेवणे उचित नाही. गेल्यावर्षी जूनमध्ये सचिन वाझेचा जामीन अर्ज फेटाळला गेला आहे. त्यामुळे त्याच्या आधारावरच न्यायालयाने विचार करावा. तसेच सीबीआयने देखील नमूद केलेले आहे की कायद्यानुसार जो आदेश न्यायालय घेईल तो सीबीआयला मान्य असेल.


सचिन वाझे सध्या तळोजा तुरुंगामध्ये : सचिन वाझे सध्या तळोजा तुरुंगामध्ये आहे. तुरुंगातूनच सचिन वाझे याने लेखी अर्ज न्यायालयामध्ये पाठवला आहे. या याचिकेमध्ये सचिन वाझेने नमूद केले आहे की, या प्रकरणामध्ये तपास सुरू आहे. खटला पूर्ण होईपर्यंत साक्ष देण्यासाठी जी व्यक्ती आहे. त्याला खटला सुरू असेपर्यंत तुरुंगात का ठेवावे? जर मला साक्ष देण्या संदर्भात जर अटक केली आहे. तर साक्ष दिल्यानंतर मला सुटका मिळायला हवी. त्यासाठी माझ्या अर्जाचा विचार व्हावा असे देखील सचिन वाझे याने आपल्या अर्जात म्हटलेले आहे.



तुरूंगवास भोगणे अन्यायकारक : सचिन वाझेने याचिकेमध्ये हे अधोरेखित केले आहे की, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. परंतु जवळपास येत्या काळामध्ये भविष्यात याबाबत खटला सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मला कित्येक वर्ष किंवा महिने हा तुरुंगवास भोगाव लागेल. हा एक प्रकारे माझ्यावर अन्याय आहे. गेल्या वर्षी जुन महिन्यामध्ये अटी घालून जामीन देण्यात आला होता. ट्रायल कोर्टासमोर सचिन वाझे साक्षीदार म्हणून अटकेत आहे. 21 जून 2022 रोजी त्यांचा जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला होता. आणि त्यामध्ये नमूद केले होते की कायदेशीर नियमाच्या आधारे खटला संपेपर्यंत सचिन वाझेला दिलासा देता येत नाही.


काय आहे प्रकरण : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत 2 वर्षांपूर्वी 25 फेब्रुवारी 2021 रोजी स्फोटके आढळली होती. गाडीत जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या सापडल्या होत्या, अशी माहिती महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. हा परिसर गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आहे. या घटनेची माहिती मिळताच तिथे तपास करण्यात आला. त्यानंतर जिलेटीनच्या 20 कांड्या स्कॉर्पिओ गाडीत सापडल्या. पेडर रोडवर अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे घर आहे. स्फोटकांनी भरलेली गाडी मनसुख हिरेन यांची होती. त्यांचा मृतदेह विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच आढळला. त्यानंतर प्रकरण आणखीनच चिघळले. खाडी 50-60 फूट आत मातीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह रूतला होता, क्रेनच्या मदतीने त्यांचा मृतदेह काढण्यात आला.



हेही वाचा : Mumbai Fire News: कमला नगर येथील झोपडपट्टीला भीषण आग; १२ फायर इंजिन व ८ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल

Last Updated :Feb 22, 2023, 1:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.