ETV Bharat / state

Mumbai Fire News: धारावीत झोपडपट्टीला भीषण आग;  २५ घरे जळाली!

author img

By

Published : Feb 22, 2023, 7:27 AM IST

Updated : Feb 22, 2023, 9:29 AM IST

कमला नगरमधील झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. आज पहाटे मुंबईतील कमला नगर भागातील झोपडपट्ट्यांना भीषण आग लागली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, ही आग परिसरातील स्थानिकांच्या लक्षात आली, त्यांनी अलार्म वाजवून अग्निशमन विभागाला माहिती दिली.

Mumbai Fire News
झोपडपट्टीला भीषण आग

मुंबई : धारावी कमला नगर झोपडपट्टीला लागलेली आग सकाळी ८ च्या सुमारास आग आटोक्यात आली आहे. सुमारे ४ तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. झोपडपट्टीत गारमेंट, बेकरी, गोडाऊन म्हणून वापर केल्या झोपड्यांमधील इलेक्ट्रिक वायरिंग, कपडे, पेपर, शिलाई मशीन आदी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अग्निशमन दल ते बचावकार्य करत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे. धारावी येथील कमला नगर येथील झोपड्यांना आग लागल्यानंतर १२ फायर इंजिन व ८ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही आग सकाळी ४.२० च्या दरम्यान लागली आहे. आगीत अद्याप कोणीही जखमी नसल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने सांगितले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत.

धारावीत झोपडपट्टीला भीषण आग

रहिवासी झोपेत असतानाच आग : धारावी हा परिसर झोपड्यांचा परिसर म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी दाटीवाटीने मोठ्या संख्येने झोपड्या आहेत. या झोपड्यांमध्ये दहा लाख रहिवासी वास्तव्य करतात. अशा या दाटीवाटीच्या परिसर असलेल्या धारावीमधील कमला नगर झोपडपट्टीला पहाटे ४.२० च्या दरम्यान आग लागली. अनेक रहिवासी झोपेत असतानाच आग लागल्याचे कळताच परिसरातील रहिवाशांनी तेथून पळ काढला. परिसरात आरडाओरड सुरू झाली.



लेव्हल ३ ची आग : कमला नगरमधील रहिवाशांनी आगीची माहिती मुंबई अग्निशमन दलाला पहाटे दिली. आग लागली त्या ठिकाणच्या बाजूलाच धारावी अग्निशमन केंद्र आहे. येथील अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली. या परिसरात मोठ्या प्रमाणात अरुंद रस्ते असल्याने अग्निशमन दलाची वाहने आत जाणे अडचणीचे ठरत होते. मात्र त्यानंतरही अग्निशमन दल आगीच्या ठिकाणी पोहचले. बाजूला लागून दाटीवाटीने झोपड्या असल्याने आग पसरत जात होती. यामुळे पहाटे ५.१४ वाजता आग लेव्हल ३ ची असल्याची घोषणा अग्निशमन दलाने केली.



कोणीही जखमी नाही : आगीची भीषणता वाढत असल्याने अग्निशमन दलाने आगीची लेव्हल ३ ची घोषणा केल्यावर इतर अग्निशमन केंद्रावरील वाहने आगीच्या ठिकाणी बोलावण्यात आली. पुढील काही वेळात १२ फायर इंजिन ८ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. आगीच्या ठिकाणाहून सर्व रहिवासी बाहेर पडल्याने कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मुंबई अग्निशमन दल व पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान ही आग का लागली? याची चौकशी अग्निशमन दलाकडून केली जाणार आहे. आग व इमारतींचे भाग, घरे, भिंती कोसळणे, समुद्रात, नाल्यात, नदीत, विहिरीत, खाडीत, खदानात, मॅनहोलमध्ये पडणे अशा २०१३ पासून २०१८ या ५ वर्षांच्या कालावधी ४९ हजार १७९ दुर्घटनांची नोंद पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे.

हेही वाचा : Thane Crime: जळगाव न्यायालय परिसरात गोळीबाराचा प्रयत्न करून झाला होता फरार; आरोपीला मंगला एक्सप्रेसमधून पिस्तूलसह अटक

Last Updated :Feb 22, 2023, 9:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.