ETV Bharat / state

Top News Today : दिवसभरात कोठे, काय होणार? आजच्या महत्त्वाच्या घडामोडी , वाचा एका क्लिकवर

author img

By

Published : Nov 13, 2022, 7:06 AM IST

आज दिवसभरात कोठे काय असणार, आजच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया या बुलेटीनच्या माध्यमातून. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. (Read Top News Today )

Top News Today
आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

मुंबई : आज दिवसभरात कोठे काय असणार, आजच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया या माध्यमातून. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वाचा एका क्लिकवर. (Read Top News Today )

भारत जोडो यात्रा : भारत जोडो पदयात्रेत राहुल गांधी ( Rahul Gandhi ) मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवत आहेत. कळमनुरी भागात काही शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी शेतातील सर्व पीक वाया गेल्याचे दाखवले, सोयाबीन पुर्णपणे जळून गेले होते पण पीकविमा कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळत नाही. यावेळी विमा कंपन्या शेतकऱ्यांची खुलेआमपणे लूट करत असल्याचा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला. Bharat Jodo Yatra hingoli मनरेगाचा रोजगार मिळत नाही, कामगारांच्या हाताला काम नाही, पैसाही नाही. शेतात राबणाऱ्या शेतकरीला देशोधडीला लावला आहे. असे आरोप खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi ) भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra ) रम्यान करत आहेत. आजही ते यात्रेदरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधतील.

डोंबिवली मध्यवर्ती शाखेत मुख्यमंत्र्यांची उपस्थिती : डोंबिवली मधील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेरवरून ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटात मोठा राडा झाला होता. त्यानंतर ही शाखा शिंदे गटाने घेतली. आता याच शाखेला पूर्ण रंगरंगोटी करण्यात आली असून शाखेला आणि आजूबाजूच्या इमारतीला भव्य रोषणाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आज या शाखेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे( CM Eknath Shinde Present At Dombivli Branch) उपस्थित राहणार आहेत. आज 13 नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीत येणार आहेत. त्यांच्या हस्ते ४४५ कोटींच्या विविध रस्त्यांच्या कामाचे भमिपूजन करणार आहे. या भमिपूजन सोहळ्याचे बॅनर डोंबिवली शहर आणि ग्रामीण भागात लावण्यात आले आहेत. शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवरून दोन गटात राडा झाला होता, आता ती शाखा शिंदे गटाने घेतली असून मुख्यमंत्री या शाखेत उपस्थित राहणार आहेत.

दीपाली सय्यद यांचा शिंदे गटात प्रवेश : ठाकरे गटाच्या नेत्या, दीपाली सय्यद आज अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार ( Deepali Syyed joins Shinde group ) आहेत. दीपाली सय्यद यांनी स्वत: याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. दीपाली आज दुपारी एक वाजता ठाण्यातील कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी मला शिवसेनेत आणलं होतं. मी शिवसेनेतच शिंदेंबरोबर आहे असं दीपाली सय्यद यांनी सांगितले.उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. उद्धव ठाकरेंनी दोन पावलं मागे यायला हवं होतं. ते मागे आले असते तर काहीतरी झालं असतं. असे त्यांनी म्हटले.

पावसाची शक्यता : भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस कोसळणार ( Chance of rain in maharashtra ) आहे. हवामान विभागाच्या मते मध्य महाराष्ट्र आणि कोकणात 13 आणि 14 ला पाऊस पडणार आहे. येत्या पाच ते सहा दिवसात दक्षिण कोकणात देखील पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातील वायव्य भागापासून श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा पावसासाठी कारणीभूत ठरणार आहे. पुढील 24 तासांत या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता अजूनच वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली असून 12 नोव्हेंबरला हा कमी दाबाचा पट्टा तमिळनाडू-पुद्दुचेरी किनारपट्टीवर धडकणार आहे.

पावसामुळे आजचा फायनलचा सामना रद्द : क्रिकेट चाहत्यांना निराश करणारी एक बातमी. आज रविवारी 13 नोव्हेंबरऐवजी ही मॅच सोमवारी 14 नोव्हेंबरला होण्याची जास्त शक्यता ( final match canceled due to rain ) आहे. आणि याचे कारण आहे मेलबर्नमधलं सध्याचे हवामान. मेलबर्नमध्ये रविवारी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. आतापर्यंत इथे खेळवण्यात आलेले वर्ल्ड कपचे तीन सामने पावसामुळे रद्द करण्यात आले होते. त्यात फायनलमध्येही पाऊस बरसण्याची शक्यता असल्याने चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. फायनलसाठी तब्बल 90 हजार प्रेक्षक एमसीजीवर उपस्थित राहणार आहेत. पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारी पाऊस पडण्याची शक्यता 95 टक्के इतकी आहे. रविवारी पावसामुळे खेळ होऊ शकलेनाही तर सोमवारी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.