ETV Bharat / state

राष्ट्रवादी काँग्रेसने एनडीएसोबत यावे, रामदास आठवलेंचे शरद पवारांना अवाहन

author img

By

Published : Jul 12, 2020, 8:46 PM IST

Updated : Jul 14, 2020, 5:08 PM IST

रामदास आठवले
रामदास आठवले

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आणि वंचित बहुजन आघाडीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणारा नराधमास अद्यापही अटक झाली नसल्याने तीव्र शब्द शब्दात निषेध अणि घोषणाबाजी करत आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

मुंबई - ११ जुलै १९९७ ला काही समाजकंटकांनी रमाबाई नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. त्यानंतर देशभर संताप व्यक्त करत भीमसैनिकांनी आंदोलन केले होते. या आंदोलनात तत्कालीन पोलिसांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ११ भीमसैनिक शहीद झाले होते. यानिमित्ताने दरवर्षी ११ जुलैला भीमसैनिक रमाबाई आंबेडकर नगर येथील शहीद स्मारक येथे येऊन शहीद भीमसैनिकांना अभिवादन करत असतात. यावर्षीही खासदार रामदास आठवले यांनी भीमसैनिकांसोबत याठिकाणी शहीदांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, यावेळी कोरोनाचे महासंकट असताना प्रशासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करत रिपाई आणि वंचित बहुजन आघाडीच्या भीमसैनिकांनी शहीदांना अभिवादन केले. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत (एनडीए) यावे असे आवाहन केले.

'मनोहर कदमला फाशी झालीच पाहिजे'
११ जुलै १९९७ ला घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. त्यानंतर देशभर या घटनेचे पडसाद उमटले होते. दरम्यान घाटकोपरमध्ये तणावपूर्ण वातावरणात आंदोलने होत असताना, तत्कालीन पोलिसांनी आंदोलनातील जमाव पांगवण्यासाठी अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात ११ भीमसैनिकांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. यावर्षी या हत्याकांडला २३ वर्ष पूर्ण झाले असताना, ११ भीमसैनिकांवर गोळ्या चालवण्याचे आदेश देणारा नराधम तत्कालीन पोलीस अधिकारी मनोहर कदम याला अद्यापही फाशीची शिक्षा झाली नाही, ही दुर्देवी बाब असून आम्ही सातत्याने सरकारकडे मागणी करत असून मनोहर कदमला फाशी झालीच पाहीजे अशी मागणी खा. रामदास आठवले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

रामदास आठवले यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादीने एनडीए मध्ये यावे -

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या १०५ जागा आल्या. मात्र, त्या जागा त्यांना शिवसेनेच्या जोरावर मिळाल्या आहेत, या शरद पवारांनी मांडलेल्या मताशी सहमत नाही. शरद पवारांबद्दल आदर आहे. मात्र, एकत्र लढल्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरी झाली. शिवसेनेने बीजेपीच्या जागा पाडल्या. शिवसेनेचा राष्ट्रवादी बरोबर समझोता होता. राष्ट्रवादीच्या 56 जागा निवडून आल्या आहेत. राष्ट्रवादीला शिवसेनेबरोबर जाऊन काही फायदा होणार नाही आहे. यामुळे पवारांनी एनडीए सोबत यावे, यामुळे देशाला अनुभवी नेता मिळेल असे मतही आठवले यांनी व्यक्त केले.

Last Updated :Jul 14, 2020, 5:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.