ETV Bharat / state

New Year 2023 Projects Gift : पूर्णत्वास जाणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांची नववर्षात महाराष्ट्राला भेट, जाणून घ्या सविस्तर

author img

By

Published : Dec 31, 2022, 9:47 PM IST

मुंबई आणि महाराष्ट्रात विकासाचे (Happy New Year 2023) अनेक प्रकल्प सुरू असून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत विशेष कामे सुरू असून कोस्टल रोड सह, मुंबईचे सुशोभिकरण आणि मेट्रोच्य़ा काही लाईनवर रेल्वे नव्या वर्षात (Projects Nearing Completion gift to Maharashtra citizens) धावणार आहे. तसेच मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंक प्रकल्प सुरू आहे. तर विदर्भातील २१ सिंचन प्रकल्प नव्या वर्षात पूर्ण होण्याची शक्यता सरकारने व्यक्त केली आहे. याशिवाय गोसीखूर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचेही काम प्रगतीपथावर असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून नागरिकासाठी सरकारचे ही नव्या वर्षातील भेट (New Year Projects Gift) असणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देताना या वर्षीचे (Happy New Year 2023) अनेक प्रकल्प प्रगतीपथावर (Projects Nearing Completion) असल्याचे सांगितले जात आहे. तर नवीन वर्षात राज्यातील हे महत्वाचे प्रकल्पांचे काम पूर्ण करून ते नागरिकांसाठी भेट (Projects Nearing Completion gift to Maharashtra citizens) ठरू शकतात. राज्यात मुंबई सह विविध ठिकाणी महत्वाच्या प्रकल्पांचे काम सुरू आहे. (New Year Projects Gift)

  • मिसिंग लिंक प्रकल्प : जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी प्रकल्प होणार असून, लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरणार आहे. या प्रकल्पात जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे काम अतिशय आव्हानात्मक होते. लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास 500 ते 600 फूट अंतरावर हा बोगदा आहे. बोगद्याची लांबी 8 किमी. असून, जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा बोगदा बांधण्यात येत आहे. बोगद्याची रुंदी 23.75 मीटर असून, देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक रुंदीचा हा बोगदा आहे. मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे अंतर अर्ध्या तासाने कमी होणार आहे. बोगद्यामुळे घाटाचा भाग पूर्णत: टाळला जाऊन अपघातसंख्येत मोठी घट होईल, असा दावा सरकारने केला आहे.
  • मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प : मुंबईतील बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं काम 87% काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे 2023 पासून या मार्गावर वाहने धावताना दिसतील. मुंबई ते उरण हे अंतर फक्त 20 मिनिटात पार करता येणार आहे. जवळपास 17 हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलाच्या निर्मितीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. 7.8 कि.मी.च्या मार्गासाठी जवळपास 60 हजार टन स्टील आणि 3.75 लाख क्युबिक मीटर क्राँक्रिट वापरण्यात आला आहे. मुंबई-ट्रान्स हार्बर लिंक हा असा मार्ग आहे जो मुंबईला थेट नवी मुंबई, उलवे, न्हावाशेवा आणि जेएनपीटी या शहरांशी जोडेल. हा प्रवास करण्यासाठी दीड ते दोन तास लागत होते, मात्र या मार्गामुळे हा प्रवास आता केवळ 20 मिनिटात होणार आहे.
  • मुंबईतील नवीन मेट्रो कामांना सुरूवात : नवी मुंबईकर आणि कल्याणकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नव्या वर्षात, 2023 मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) कल्याण ते तळोजा मेट्रो 12 मार्गिकेसह ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 च्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने एमएमआरडीएकडून तयारी सुरू आहे.
  • दोन मेट्रो लाईनवर धावणार रेल्वे : मुंबई आणि एमएमआरमधील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी एमएमआरडीएकडून 337 किमी मेट्रोचे जाळे विणले जात आहे. यातील मेट्रो 1 (वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर) ही एकमेव मेट्रो मार्गिका पूर्णतः कार्यान्वित आहे. तर मेट्रो 2 अ (दहिसर ते डीएन नगर)आणि मेट्रो 7 ( दहिसर ते अंधेरी) मार्गिकेतील दहिसर-डहाणूकरवाडी-आरे असा २० किमीचा एक टप्पा एप्रिल २०२२ मध्ये सेवेत दाखल झाला आहे. तर मेट्रो 2 ब, 3, 3,3 अ, मेट्रो 5(टप्पा 1), मेट्रो 6, मेट्रो 9 चे काम सध्या वेगात सुरू आहे. यातील मेट्रो 2 अ आणि 7 चा दुसरा टप्पा महिन्याभरात सेवेत दाखल होणार आहे. असे असताना नव्या वर्षात एमएमआरडीएने आणखी दोन मार्गिकेच्या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीएमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. कल्याण ते तळोजा मेट्रो 12 आणि मेट्रो 5 मधील भिवंडी ते कल्याण अशा दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.
  • कोस्टल रोड प्रकल्प : 2023 नंतर मुंबईच्या पश्चिम भागात ट्रॅफिक जाम दिसणार नाही. मुंबई कोस्टल रोड प्रकल्प (Coastal Road Project) नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल असा दावा मुंबई महानगरपालिकेचे (बीएमसी ) आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी शनिवारी (1 ऑक्टोबर) केला. मुंबई कोस्टल रोड प्रकल्प पूर्ण होताच संपूर्ण पश्चिम मुंबई समुद्राने जोडली जाईल. हा रस्ता मुंबईतील नरिमन पॉइंटमार्गे बोरिवलीला जाणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने तो विरारला जोडला जाणार आहे. भविष्यात हा रस्ता अलिबागशीही जोडला जाईल. आता कोस्टल रोडच्या बांधकामासोबतच या प्रकल्पांतर्गत इतर सुविधांचाही विस्तार करता येणार आहे. यापूर्वी काही स्वयंसेवी संस्थांकडून पर्यावरणाचे कारण पुढे करून याचिका दाखल करून विरोध केला जात होता. त्यामुळे प्रकल्प लटकण्याची शक्यता बळावली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने संबंधित याचिकेवर निकाल देताना त्यासंबंधीचे अडथळे बऱ्याच अंशी दूर केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे बीएमसीला हे काम पुढे नेण्यात जे अडथळे येत होते ते आता दूर झाले आहेत.
  • कोस्टल रोड प्रकल्पाचे फायदे : मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प हा उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो. 14 हजार कोटींचे बजेट असून ते नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्याच्या तयारीने वाहतुकीची समस्या तर दूर होईलच, पण लोकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी पर्यायी मार्ग आणि साधन मिळेल. त्यासोबतच आजूबाजूला होणाऱ्या विकासामुळे रोजगारही वाढणार आहे.
  • २०२३ मध्ये मुंबई होणार चकाचक : मुंबईचे अत्यंत खराब झालेले रस्ते खड्डेमुक्त करतानाच पूल, फूटपाथ, उद्याने, समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता, रंगरंगोटी, विद्युत सुशोभीकरणासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. मुंबईचे सौंदर्यीकरण, सुशोभीकरणासंदर्भातील कामे जोरदारपणे सुरू आहेत. मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी या प्रकल्पाची कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. डिसेंबर, 2022 पर्यंत त्यातील 50 टक्के कामे पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेने पेलले आहे. हा संपूर्ण प्रकल्प मार्च, 2023 पर्यंत पूर्णत्वास नेण्याचेही उद्दिष्ट समोर ठेवण्यातआले आहे.
  • विदर्भातील २१ सिंचन प्रकल्प पूर्णत्वास : केंद्र आणि राज्य सरकारने वेळोवेळी पुरेसा निधी दिल्यास विदर्भातील 21 लघु, मध्यम व मोठे प्रकल्प जून 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने केले आहे. तर गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्प 2024-25 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियोजनानुसार, जून 2023 पर्यंत 21 प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे. गोसीखुर्द प्रकल्प आणखी एक वर्षांने पुढे जाण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाच्या उजवा कालवा आणि घोडाझरी शाखा कालव्याच्या कामात अजूनही फारशी प्रगती नसल्याचे अलीकडेच केलेल्या एका पाहणी दौऱ्यात दिसून आले.
  • विदर्भाच्या सिंचन क्षमतेत वाढ : गोसीखुर्दसाठी राज्य सरकारने 2022-23 च्या अर्थसंकल्पात 853.45 कोटींची तरतूद केली आहे. या प्रकल्पाचे काम तीन दशकांपासून सुरू आहे. रेंगाळत ठेवल्याने प्रकल्पाची किंमत 280 कोटी वरून 18000 कोटींवर पोहोचली आहे. आता विदर्भातील सर्व 123 प्रकल्प पूर्ण होण्यास 43,560 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. विदर्भात एकूण 1042 प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. सन 2020-21 या आर्थिक वर्षांत जून 21 पर्यंत एकूण 10 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. जून 2023 अखेर 21 प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. विदर्भाची सिंचन क्षमता 12.98 लाख हेक्टर तर प्रत्यक्ष सिंचन 8.60 लाख हेक्टर आहे. सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अंतिम सिंचन क्षमता 22.55 लाख हेक्टर होणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.