ETV Bharat / state

पोलीस मारहाण प्रकरण : अर्णब गोस्वामींकडून अटकपूर्व जामीन याचिका मागे

author img

By

Published : Dec 17, 2020, 4:13 PM IST

सत्र न्यायालयामध्ये अर्णब गोस्वामी व त्यांच्या पत्नीकडून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, हा अटकपूर्व जामीन अर्ज अर्णब गोस्वामी व त्यांच्या पत्नीने मागे घेतला आहे.

पोलीस मारहाण प्रकरण : अर्णब गोस्वामींकडून अटकपूर्व जामीन याचिका मागे
पोलीस मारहाण प्रकरण : अर्णब गोस्वामींकडून अटकपूर्व जामीन याचिका मागे

मुंबई - अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अर्णब गोस्वामी यांना याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अटक होत असताना महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करण्याच्या संदर्भात त्यांच्यावर मुंबई पोलिसांच्या एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. याप्रकरणी सत्र न्यायालयामध्ये अर्णब गोस्वामी व त्यांच्या पत्नीकडून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, हा अटकपूर्व जामीन अर्ज अर्णब गोस्वामी व त्यांच्या पत्नीने मागे घेतला आहे.

अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या स्टूडिओसाठी इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांनी काम करून दिले होते. यासंदर्भात काही पैशांची थकबाकी असताना पैसे न मिळाल्यामुळे 2018 मध्ये अन्वय नाईक यांनी अलिबागमध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये गोस्वामी यांचे नाव आढळल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई रायगड पोलिसांनी केली होती.

अर्णबसह दोघांवर आहेत आरोप -

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण पुन्हा सुरू करण्याबाबत अनव्य नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने राज्य शासनाकडे मागणी केली होती. त्यानंतर या केसचा तपास हा सीबीआयकडे देण्यात आला होता. आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक भारताचे संपादक अर्णब गोस्वामी, नितेश सरडा, फिरोज शेख यांच्यावर आरोप आहे. त्यानुसार रायगड पोलिसांनी या तिघांना अटक केली होती. त्यानंतर अर्णब, नितेश आणि फिरोज याना जिल्हा सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.