ETV Bharat / state

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

author img

By

Published : Nov 14, 2022, 7:44 AM IST

case filed against Jitendra Ahwad
जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल

ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय दंड विधान कलम 354 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली ( Case Registered At Mumbra Police Station ) आहे.

मुंबई : जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. महिलेच्या विनयभंगाचा एक गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल झाला (Woman Registered Molestation Case On Jitendra Awhad ) आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 354 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली ( Case Registered At Mumbra Police Station ) आहे.

'हर हर महादेव' चित्रपट : 'हर हर महादेव' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आक्षेपार्ह बाबी आढळल्याचा दावा करीत त्या आधारे या चित्रपटाला माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध ( NCP MLA Jitendra Awhad ) केला. यातील ऐतिहासिक बाबी काढून टाकाव्या यासाठी त्यांनी ठाणे शहरातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहातील एक शो बंद देखील केला. त्या संदर्भात त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल ( Case Registered Against Jitendra Awhad ) केला. हे प्रकरण संपत नाही, तोपर्यंत

पोलिसांचा ससेमिरा संपत नाही : पोलिसांचा ससेमिरा जितेंद्र आव्हाडांचा संपत नाही. नुकतेच हर हर महादेव चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात ऐतिहासिक बाबी असल्याचे म्हणत चित्रपटगृहातील चित्रपट बंद करण्याचे काम त्यांनी केले होते. त्यात एका प्रेक्षकाला राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा गुन्हा नोंदला गेला होता. आणि त्या आधारे त्यांना तुरुंगात देखील जाण्याची पाळी आली होती. मात्र न्यायालयाने त्यांना जामीन दिला. आता मात्र एका महिलेच्या विनयभंगाच्या संदर्भात गुन्हा जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालाय. त्यामुळे पोलिसांचा ससेमिरा जितेंद्र आव्हाडांचा पाठ सोडत नाही, अशी स्थिती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 354 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली ( Case Registered At Mumbra Police Station ) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.