ETV Bharat / state

Nitin Raut on Power shortage : राज्यात मोठ्या प्रमाणात वीज टंचाई; राज्य अंधारात लोटणार नाही - नितीन राऊत

author img

By

Published : Mar 29, 2022, 1:20 PM IST

राज्यात वीज कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर गेलेले आहेत. ( Electricity Workers on Strike ) व वारंवार विनंती करून सुद्धा ते संप मागे घेण्याच्या तयारी नाही आहेत. याबाबत आता ऊर्जामंत्री नितीन राऊत ( Energy Minister Nitin Raut on Strike ) यांनी त्यांना स्पष्टपणे कडक शब्दात इशारा दिला आहे. मुंबई पत्रकारांशी ते बोलत होते.

nitin raut
नितीन राऊत

मुंबई - राज्यात वीज कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर गेलेले आहेत. ( Electricity Workers on Strike ) व वारंवार विनंती करून सुद्धा ते संप मागे घेण्याच्या तयारी नाही आहेत. याबाबत आता ऊर्जामंत्री नितीन राऊत ( Energy Minister Nitin Raut on Strike ) यांनी त्यांना स्पष्टपणे कडक शब्दात इशारा दिला आहे. मुंबई पत्रकारांशी ते बोलत होते. याप्रसंगी बोलताना ऊर्जामंत्री म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने कधीही खासगीकर्णाचे समर्थन केलेले नाही. आम्ही करणारही नाही. पण त्यांची अजून भेट झालेली नाही अशी चर्चा करण्यासाठी दुपारी तीनची वेळ दिली होती. राज्यात पुरवठा व्यवस्थित होत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये वीज टंचाई निर्माण झाली आहे.

उष्णतेच्या कडाक्याने विजेची मागणी वाढली - विजेची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. राज्यातील जनतेने विजेचा उच्चांक गाठला आहे. राज्यात रब्बीचा हंगाम सुरू आहे, यामध्ये शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, आणि उष्णतेचे प्रमाण वाढल्याने अनेक लोकांना गारवा हवा असतो, त्यासाठी कूलर, एसी, फ्रीज याची आवश्यकता लोकांना पडत आहे. आज विजेची मागणी 28 हजार मेगावॅट पर्यंत पोहचली आहे. दीड ते दोन हजार मेगावॅट वीज बाहेरून विकत घेत असतो.

विषय चर्चेच्या माध्यमातून सोडवले जाऊ शकतात - आमचे सर्व प्लांट सुरू आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही विजेची टंचाई निर्माण झाली तरी आम्ही वीज पुरवठा थांबवणार नाही तर राज्याला अंधारात, लोड शेडींग मध्ये लोटणार नाही. कालपासून कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यांचे विषय चर्चेच्या माध्यमातून सोडवले जाऊ शकतात. मी त्यांना विनंती केली होती परंतु त्यांनी विनंतीला सकारात्मक उत्तर न दिल्याने मी आजची बैठक रद्द केली. काही संघटनांच्या नेत्यांनी मला संपर्क केला पण मी त्यांना सांगितलं मी बैठक घेणार नाही. ऊर्जा खात्याचे प्रधान सचिव कंट्रोल रूममधून या सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहेत अशा पद्धतीने राज्याला सावरण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. यापुढेही करत राहू. मी त्या सर्व वीज कर्मचाऱ्यांचे आभार मानतो जे कामावर आहेत. एवढा तुटवडा असताना सुद्धा त्यांनी राज्याला लोड शेडिंग मध्ये जाऊ दिलं नाही.

हेही वाचा - Home Minister : कोरोना काळातील 'हे' गुन्हे मागे घेणार - वळसे पाटील

संप मागे घ्या, ही विनंती - महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही संघटनांच्या नेत्यांची सदैव संवाद साधण्यासाठी तयार आहोत मी सर्व वीज कर्मचारी संघटना व कर्मचाऱ्यांचा कुटुंबप्रमुख आहे या नात्याने त्यांनी संप मागे घ्यावा व राज्य सरकारला सहकार्य करावे अशी विनंती मी त्यांना करतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.