ETV Bharat / state

बनावट पेमेंट अ‌ॅपच्या माध्यमातून लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या आरोपीला अटक

author img

By

Published : Jan 23, 2020, 4:16 PM IST

सायबर क्राईम
सायबर क्राईम

बनावट मोबाईल अ‌ॅपच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर केल्याचे भासवून लाखो रुपयांचे सोने लुबाडणाऱ्या एकाला मुंबई पोलिसांनी अटक केली. मागील काही महिन्यांपासून आरोपी वेगवेगळ्या ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन आपण मोठा बांधकाम व्यावसायिक असल्याचे सांगत. घरात लग्नकार्य असल्याने सोन्याचे दागिने विकत हवे असल्याचे दुकानदारांना भासवत असे.

मुंबई - ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन बनावट मोबाईल अ‌ॅपच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर केल्याचे भासवून लाखो रुपयांचे सोने लुबाडणाऱ्या एकाला मुंबई पोलिसांनी अटक केली. निखिल दुर्गेश सुमन (वय-26) या आरोपीचे नाव आहे. मुंबई पोलिसांच्या मालमत्ता शाखेने निखिलवर कारवाई केली.

लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या आरोपीला अटक


मागील काही महिन्यांपासून आरोपी वेगवेगळ्या ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन आपण मोठा बांधकाम व्यावसायिक असल्याचे सांगत. घरात लग्नकार्य असल्याने सोन्याचे दागिने विकत हवे असल्याचे दुकानदारांना भासवत असे. सोन्याचे दागिने घेतल्यावर पैसे मोबाईलमधील बँक पेमेंट अ‌ॅपच्या माध्यमातून पैसे पाठवल्याचा स्क्रीन शॉट दुकानदारांना दाखवत असे. तुमच्या बँकेचे सर्व्हर डाऊन असून माझ्या खात्यातून वजा झालेले पैसे तुमच्या खात्यात येण्यास वेळ लागेल, असे सांगत निखील सुमन सांगत असे. त्यानंतर सोने घेऊन निघून जात असे. आरोपी निखिल सुमन हा प्रत्येक वेळी वेगळा मोबाईल क्रमांक दुकानदारांना देत होता.

हेही वाचा - माजी क्रिकेटर अझहरुद्दीनसह तिघांवर औरंगाबादेत फसवणुकीचा गुन्हा दाखल

पैसे मिळाले नसल्याचे लक्षात आल्यानंतर दुकानदार निखिलने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न करत मात्र, संपर्क होत नसे. अशाच एका प्रकरणात मुंबईतील मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका ज्वेलर्सच्या दुकानातून आरोपी निखिलने 5 लाख 33 हजार रुपयांच्या 7 सोन्याच्या साखळ्या घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणी मालमत्ता कक्ष पोलिसांनी तांत्रिक तपास केला. त्यानंतर त्यांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. निखिल सुमनने आत्तापर्यंत ठाणे, मीरा रोड, वसई, विरार, पालघर या ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे समोर आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Intro:मुंबईतील वेगवेगळ्या परिसरात असलेल्या ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन बनावट मोबाईल ऐप द्वारे एनईएफटि च्या माध्यमातून पैसे ट्रान्स्फर केल्याचे भासवीत लाखो रुपयांचे सोने घेऊन लुबाडणाऱ्या निखिल दुर्गेश सुमन (26) या भामट्याच्या मुसक्या मुंबई पोलिसांच्या मालमत्ता शाखेने आवळल्या आहेत.


गेल्या काही महिन्यांपासून अगदी सफाईदार इंग्रजी बोलणारा हा आरोपी वेगवेगळ्या ज्वेलर्स च्या दुकानात जाऊन आपण स्वतः मोठे बांधकाम व्यावसायिक असून घरात लग्नकार्य असल्याने सोन्याचे दागिने विकत हवे असल्याचे आरोपी दुकानदारांना सांगत असे. सोन्याचे दागिने घेतल्यावर पैसे मोबाईल मधील बँक पेमेंट ऐप च्या माध्यमातून एनईएफटि केले असल्याचा स्क्रीन शॉट आरोपी दुकानदारांना दाखवत असे. मात्र दुकानदारांच्या खात्यात पैसे न आल्याने तुमच्या बँकेचे सर्वर डाऊन असून माझ्या खात्यातून वजा झालेलं पैसे तुमच्या अकौंटला येण्यास वेळ लागेल असे सांगत आरोपी निखील सुमन हा मुद्देमाल घेऊन निघून जात असे. यावेळी आरोपी निमिष सुमन हा प्रत्येक वेळेस त्याचा वेगवेगळा मोबाईल क्रमांक दुकानदारांना देत होता.



Body:पैसे न मिळाल्याने दुकानदारांनी मोबाईल क्रमांकावर आरोपीला संपर्क साधला असता आरोपीचा मोबाईल नंबर सेवेत नसल्याच पीडित दुकानदारांना कळून येत होते. अशाच एका प्रकरणात मुंबईतील मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका ज्वेलसर्च्या दुकानातून आरोपी निखिल याने 5 लाख 33 हजार रुपयांच्या 7 सोन्याच्या साखळ्या घेऊन पोबारा केला होंता. या प्रकरणी मालमत्ता कक्ष पोलिसांनी तांत्रिक तपास करीत सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. अटक आरोपीने आतापर्यंत ठाणे , मीरा रोड , वसई , विरार , पालघर सारख्या परिसरात अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे समोर आले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. Conclusion:( रेडी टू अपलोड पॅकेज जोडले आहे.)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.