ETV Bharat / state

Accelerator Off : प्लॅटफॉर्मवरील एक्सलेटर बंद, रेल्वे प्रवाशांना मनस्ताप

author img

By

Published : Mar 15, 2023, 7:39 PM IST

Accelerator Off
Accelerator Off

वयोवृद्ध, अपंग तसेच गरोदर महिला आदींसाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवरून पुलावर जाण्यासाठी एक्सलेटर म्हणजेच सरकते जीने बसवण्यात आले आहेत. मात्र त्यापैकी बहुसंख्य एक्सलेटर बंद आहेत. त्यामुळे वयोवृद्ध, अपंग तसेच गरोदर महिला प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावर मेंटेनंन्स कडे दुर्लक्ष केले जात असल्याने प्रवाशांसाठी ही दुःखाची बाब असल्याची प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी संघटनेने दिली आहे.

मुंबई : मुंबईमध्ये मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कर्जत कसारा, हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार पर्यंत रेल्वे सुरु आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सुमारे ७० लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. यामधील वयोवृद्ध, अपंग, आणि गरोदर महिला प्रवाशांच्या सुविधेसाठी एक्सलेटर बसवण्यात आले आहेत. मुंबईमध्ये आता पर्यंत सुमारे १५० एक्सलेटर बसवण्यात आले आहेत. यातील बहुसंख्य एक्सलेटर बंद असतात. त्यामुळे बंद एक्सलेटर वरून प्रवाशांना पायी चालून पुलावर यावे लागते. त्यानंतर ट्रेन मधून प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

नवीन तंत्रज्ञानावर कार्यवाही सुरु: काही प्रवासी मुद्दाम मजा म्हणून एक्सलेटर्सचे लाल बटण दाबतात. एक्सलेटर बंद पडल्यावर त्याचा खालचा भाग खोलून पुन्हा सुरु करावे लागतात. यात काही वेळ जातो. एक्सलेटर्सच्या खालच्या भागात न जाता पुन्हा ते कसे सुरु करता येईल यासाठी नवीन तंत्रज्ञानावर कार्यवाही सुरु आहे. लवकरच हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. लवकरच विक्रोळी, मुलुंड, मुंब्रा आणि दिवा या स्थानकावर एक्सलेटर उभारली जाणार आहेत अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

हलक्या प्रतीच्या लोकांना कंत्राट : रेल्वेमधील वयोवृद्ध, अपंग आणि गरोदर महिला यांना प्लॅटफॉर्मवरून पुलावर जाण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागू नयेत म्हणून एक्सलेटर लावण्यात आले. एक्सलेटर लावल्याने आम्ही प्रवासी खुश आहोत. मात्र गर्दीच्या वेळी बरेचसे एक्सलेटर बंद असतात. त्याचा प्रवाशांना खूप त्रास होतो. चांगल्या प्रकारचे मेंटेनंस करणाऱ्या लोकांच्या ऐवजी हलक्या प्रतीच्या लोकांना कंत्राट दिली आहेत. एक्सलेटर दुरुस्त करणारी मुले असल्याने ते कार्यक्षम नसतात. कामाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे एक्सलेटर त्वरित दुरुस्त व्हायला पाहिजेत अशी प्रतिक्रिया उपनगरीय रेलवे प्रवासी एकता संस्था महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली आहे.

हेही वाचा : Job in India : तंत्रज्ञान क्षेत्रातील टाळेबंदी दरम्यान, 'या' नोकरीला भारतात सर्वाधिक मागणी आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.